(फोटो सौजन्य – Pinterest)
भारत त्याच्या सौंदर्य आणि विविधतेसाठी जगभर ओळखला जातो. इथे अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत जी पाहण्यासाठी लोक दूरदूरहून भारतात येत असतात. सुंदर टेकड्यांपासून ते शांत समुद्रापर्यंत, भारतात भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. इथे पर्यटक धार्मिक, ऐतिहासिक अशा अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. भारतात नैसर्गिक सौंदर्याने नटलेलीही अनेक ठिकाणे आहेत जिथले सौंदर्य तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकेल. दरम्यान जगभरात परदेशी पर्यटनाची क्रेझ फार वाढत आहे, लोक दुसऱ्या देशाची संस्कृती, तिथले सौंदर्य पाहण्यासाठी परदेशी जातात. मात्र यात फार पैसे मोजावे लागतात.
व्हिसाशिवाय पाकिस्तानी व्यक्ती आला भारतात! घेतला वडापावचा आस्वाद; असं कुणीही देशात येऊ शकतं का?
अमेरिकेतील स्विझर्लंड हे ठिकाण परदेशी पर्यटनासाठी पर्यटकांचे एक प्रमुख आणि विशेष आवडीचे ठिकाण आहे मात्र तुम्हाला माहिती आहे का? भारतातही एक सुंदर ठिकाण आहे ज्याला भारताचे मिनी स्विझर्लंड म्हटले जाते. या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही या ठिकाणाला भेट देऊन तुमची ट्रिप संस्मरणीय करू शकता. हे ठिकाण उत्तराखंडात वसले आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी परदेशी लोकांच्या प्रवेशावर बंदी आहे. या ठिकाणाचे सौंदर्य फक्त भारतीयच अनुभवू शकतात आणि कोणताही परदेशी इथे येऊ शकत नाही. हे ठिकाण नक्की कोणते आहे आणि या ठिकाणाची खासियत याविषयी चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.
परदेशांना इथे एंट्री नाही
आम्ही ज्या ठिकाणाविषयी बोलत आहोत ते ठिकाण उत्तराखंडमधील चक्राता हिल स्टेशन आहे, जे या राज्यातील एक अद्भुत हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. तथापि, या ठिकाणाचे सौंदर्य पाहण्यासाठी फक्त भारतीयच येथे जाऊ शकतात. येथे कोणताही परदेशी कधीही जाऊ शकत नाही, तर हे शहर १८६६ मध्ये इंग्रजांनी स्वतः स्थापन केले होते. त्या काळात ईस्ट इंडिया कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी चक्रात येत असत. यानंतर, १८६९ मध्ये, ब्रिटीश सरकारने ते कॅन्ट बोर्डाकडे सोपवले, परंतु सध्या येथे भारतीय सैन्याचा छावणी आहे, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव, येथे परदेशी लोकांना प्रवेश दिला जात नाही. तथापि, हे हिल स्टेशन भारतीय नागरिकांसाठी पूर्णपणे खुले आहे आणि तुम्ही येथे कोणत्याही निर्बंधाशिवाय जाऊ शकता.
इथे कोणकोणत्या ठिकाणांना देऊ शकता भेट
चक्राता हिल स्टेशनला जर तुम्ही भेट देत असाल तर इथे तुम्हाला अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येईल. इथे अशी अनेक ठिकाणे आहेत जी आपल्या नैसर्गिक सुंदरतेची ओळखली जातात. चला ही कोणती ठिकाणे आहेत त्यावर एकदा नजर टाकुयात.
ट्रेनमध्ये TTE ने गैरवर्तन केल्यास असे द्या सडेतोड उत्तर, रेल्वेचे नियम देतील तुमची साथ
टाइगर फॉल्स
चक्राता त्याच्या सौंदर्यामुळे अनेकांना आकर्षित करते. येथे भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे टायगर फॉल्स. हा धबधबा येथे भेट देण्यासारखे एक अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. शहराच्या गजबटापासून दूर तुम्ही इथे एक छान आणि शांत वेळ घालवू शकता.
बुधेर गुफा
शहरापासून फक्त ३० किमी अंतरावर असलेली ही गुहा उत्तराखंडमधील ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. जर तुम्ही चक्राताला जात असाल तर येथील बुधेर गुहेला नक्की भेट द्या. हे ठिकाण ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि हायकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासह अथवा मित्रजनांसोबत इथे एक छान, मोकळा वेळ घालवू शकता.
चिलमिरी नेक
चिलमिरी नेक हे चक्राताचे आणखी एक सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे चक्राताचे सर्वात उंच शिखर आहे, जे पाइनच्या जंगलांमध्ये वसलेले आहे. येथून तुम्ही हिमालयाच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. तसेच इथे तुम्ही येथे ट्रेकिंगचाही आनंद लुटू शकता.