(फोटो सौजन्य – Instagram)
देशात जितकी निसर्गमय ठिकाणांना लोकप्रियता आहे तितकीच लोकप्रियता धार्मिक स्थळांनीही लाभली आहे. लोक फार निष्ठेने आणि श्रद्धेने अशा ठिकाणांना भेट देण्यासाठी जातात. जगात सर्वच देशात धार्मिक पर्यटन फार सुप्रसिद्ध आहे. अशातच आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एक धार्मिक ठिकाणाविषयी माहिती सांगत आहोत जिथे जाणे काही सोपे नाही. हे एक प्राचीन चर्च आहे, जे डोंगराच्या खडकाळ ठिकाणी वसले आहे. म्हणजेच इथे जाण्यासाठी आधी तुम्हाला धोकादायक डोंगराळ भाग पार करावा लागेल, जिथून बाहेर पडणे तुमच्या साहसाला चॅलेंज कारण्यासारखे आहे. तुम्ही साहस प्रेमी असाल तर नवनवीन ठिकाणं एक्सप्लोर करायला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.
पृथ्वीवरील एलियन्सचे निवासस्थान! इथे जाताच दुसऱ्या ग्रहावर गेल्यासारखे वाटते…
या धोकादायक चर्चाचा व्हिडिओ एका ट्रॅव्हल व्लॉगरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी त्याने सांगितले की, जगातील सर्वात धोकादायक चर्चमध्ये पोहोचणे हे स्वतःचे जीवन धोक्यात घालण्यासारखे आहे. व्हिडिओमध्ये, ट्रॅव्हल व्लॉगर त्याच्या काही मित्रांसह एका खडकावर बांधलेल्या रस्त्याने चालताना दिसत आहे, जो खूप उंचीवर आहे. तुम्हाला सांगतो की, व्लॉगर ज्या रस्त्याने जात आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला एक खड्डा आहे, जिथे पडल्यानंतर एखाद्या व्यक्तीचे जगणे कठीण आहे. व्हिडिओमध्ये एक पुजारी ट्रॅव्हल व्लॉगरला मार्गदर्शन करताना दिसून येत आहे.
कुठे वसले आहे हे चर्च
“जगातील सर्वात धोकादायक चर्च” म्हणून ओळखले जाणारे, उत्तर इथिओपियातील एका कड्याच्या माथ्यावर बांधण्यात आले आहे. हे चर्च ‘अबुना येमाता गुह’ नावाने ओळखले जाते. येथे पोहोचण्यासाठी, तुम्हाला वाळूच्या दगडांची उंच शिखरे आणि उतार ओलांडावे लागतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे चर्च सुमारे २००० वर्षे जुने असल्याचे मानले जाते. एका खडकावर बांधलेले हे चर्च एका गुहेत आहे ज्यामध्ये बायबलसंबंधी शास्त्रे, शिलालेख आणि विविध चित्रे आहेत. एवढेच नाही तर हे चर्च सामान्य चर्चपेक्षा खूप वेगळे आहे आणि येथे तुम्हाला ५०० वर्षे जुने बायबल देखील पहायला मिळेल.
‘अबुना यामातो गुह’ हे इथिओपियाच्या तिग्रे प्रदेशातील होजेन वोरेडा येथे २,५८० मीटर (८,४६० फूट) उंचीवर असलेले एक अद्वितीय चर्च आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी पायी चढून जावे लागते. आम्ही तुम्हाला सांगतो की, हात आणि पायांच्या मदतीने खडकावर एक तीव्र आणि धोकादायक चढाई करावी लागते, येथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने दिली जात नाहीत. स्थानिकांच्या मते, हे चर्च सहाव्या शतकात बांधले गेले होते आणि ते नऊ संतांपैकी एक असलेल्या अबुना येमाता यांना ते समर्पित होते. आजही चर्चच्या कोरड्या हवामानामुळे, चर्चच्या भिंती आणि घुमटांवरील चित्रे चांगल्या प्रकारे जतन केलेली आहेत.