Fazlur Rehman: 'कारगिल युद्धाचे सर्वात मोठे पाप, पाकिस्तानी लष्कराने स्वतःच्या सैनिकांचे मृतदेह' मौलाना डिझेल यांचा खळबळजनक दावा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
पाकिस्तानमधील राजकीय आणि लष्करी वर्तुळात सध्या एका मोठ्या वक्तव्याने भूकंप आणला आहे. ‘मौलाना डिझेल’ या नावाने कुप्रसिद्ध असलेले आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) चे सर्वेसर्वा मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानी लष्कराच्या (Pakistan News) सर्वोच्च नेतृत्वावर आतापर्यंतचा सर्वात भीषण आणि थेट हल्ला चढवला आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मौलानांनी थेट कारगिल युद्धाचा दाखला देत पाकिस्तानी लष्कराने स्वतःच्याच सैनिकांचा आणि हुतात्म्यांचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला. मौलाना फजलुर रहमान यांच्यावर सध्या पाकिस्तान सरकारने देशद्रोहाचा खटला दाखल केला आहे, तरीही लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्या हुकूमशाही वृत्तीला न जुमानता त्यांनी हा बॉम्बगोळा टाकला आहे.
मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानी लष्कराच्या कारभाराचे वाभाडे काढताना थेट भारतीय लष्कराचा आणि कारगिल युद्धाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, “पाकिस्तानी लष्कराच्या नजरेत स्वतःच्या देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या शहीदांची किंमत काय आहे, हे त्यांनी आधी स्पष्ट करावे. कारगिलच्या युद्धात नेमके किती पाकिस्तानी सैनिक मारले गेले आणि लष्कराने त्यापैकी किती जणांचे मृतदेह सन्मानाने मायदेशी परत आणले, याची आकडेवारी जाहीर करण्याचे धाडस लष्करामध्ये आहे का?” लष्कराने स्वतःचे अपयश लपवण्यासाठी शेकडो सैनिकांचे मृतदेह युद्धभूमीतच सोडून दिले होते, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: ‘बॉम्ब पडण्याआधी शेवटचा फोन…’ अमेरिकेला इराणचा थेट सवाल; परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ
पाकिस्तानी लष्कराच्या सर्वात संवेदनशील नसलेल्या ‘हुतात्म्यांचा आदर’ या मुद्द्याला हात घालत मौलानांनी पुढे म्हटले की, “तुम्ही (पाकिस्तानी लष्कराने) स्वतःच्याच सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या (भारताच्या) स्वाधीन केले. त्यानंतर भारताकडून अधिकृत निवेदने आली की, भारतीय लष्कराने या पाकिस्तानी सैनिकांवर संपूर्ण इस्लामी रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार केले आहेत. ही पाकिस्तानसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. युद्धात मारल्या गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांची संख्या शेकडोंमध्ये आहे, पण लष्कराने आपल्या देशातील जनतेपासून ही सत्य परिस्थिती लपवून ठेवली.”
You yourselves have dishonored, insulted, and disrespected your own martyrs more than anyone else. To hide your own crimes, you try to shield yourselves behind the martyrs. We accepted Colonel Sher Khan’s body only after India 🇮🇳 insistence. You left your own martyrs in the… pic.twitter.com/xUtrGzvbMF — برهان الدین | Burhan uddin (@burhan_uddin_0) July 19, 2026
credit – social media and Twitter
मौलाना एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी कारगिल युद्धातील पाकिस्तानचे सर्वात मोठे नायक मानले गेलेले कर्नल शेर खान यांच्याबाबतही मोठा गौप्यस्फोट केला. मौलाना म्हणाले, “पाकिस्तानला जर कर्नल शेर खान यांचा मृतदेह मिळाला असेल, तर तो केवळ आणि केवळ भारताच्या आग्रहामुळे आणि विनंतीमुळे मिळाला. भारताने वारंवार आग्रह धरल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने आपल्या या अधिकाऱ्याचा मृतदेह स्वीकारला. तुम्ही स्वतःच्या हुतात्म्यांचा अपमान केला आहे आणि आता आपले संस्थात्मक अपयश अन् गुन्हे लपवण्यासाठी तुम्ही याच हुतात्म्यांच्या बलिदानामागे आश्रय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Adani Power: अदानीच्या वीज करारावरून बांगलादेशात राजकीय युद्ध; भारताला कोंडीत पकडण्याचा नवा डाव?
पाकिस्तान सध्या अत्यंत बिकट आर्थिक आणि सुरक्षा परिस्थितीचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर लष्कर आपल्या घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्याऐवजी देशातील राजकीय व्यवस्था पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी धडपडत आहे, असा थेट आरोप मौलानांनी केला. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा आणि लष्करी जनरल हे देशाच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करत असून, त्यांची संपूर्ण शक्ती केवळ स्वतःचा राजकीय प्रभाव मजबूत करण्यासाठी वापरली जात आहे, असे ते म्हणाले.
मौलानांनी जनरल आसिम मुनीर यांना इशारा देताना म्हटले की, पाकिस्तान हा कायद्याने चालणारा देश आहे, जिथे प्रत्येक संस्थेचे अधिकारक्षेत्र संविधानाने स्पष्टपणे ठरवून दिले आहे. लष्कराला त्यांच्या मर्यादांची आठवण करून देणे म्हणजे सशस्त्र दलांवर किंवा देशावर झालेला हल्ला नव्हे. तसेच, पाकिस्तानात बिघडत चाललेल्या सुरक्षा व्यवस्थेवर पांघरूण घालण्यासाठी लष्कर आता सामान्य नागरिकांची जबरदस्तीने भरती करण्याचा प्रयत्न करत आहे. लष्कराच्या या आत्मघातकी डावपेचांमुळे भविष्यात देशातील जनतेमध्ये सरकार आणि सैन्याविरोधात कधीही न संपणारे गृहयुद्ध पेटू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.






