कोल्हापुरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मंदिरातील सगळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला गरुड मंडप पुन्हा एकदा उभारण्यात येत आहे..काही महिन्यांपूर्वी दीडशे वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण केलेला गरुड मंडप वाळवी लागल्याने उतरवण्यात आला..लाकडाचा वापर करून हा गरुड मंडप दीडशे वर्षांपूर्वी बनवला होता… आता या मंदिराच्या गरुड मंडपाची पुनर्बांधणी सुरू झाली आहे.. त्यासाठी खास कर्नाटकातून सागवानचे लाकूड आणले आहे..भले मोठे खांब उभारण्याचं काम आता सुरू झालंय..हे लाकडी खांब पुढचे 150 वर्षे टिकून राहावे यासाठी लिनसाईड ऑइल लावण्यात आलं आहे.. लवकरच गरुड मंडपाचे हे काम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत..त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणेच अंबाबाई मंदिराचा गरुड मंडप पाहायला मिळणार आहे..गरुड मंडपाबरोबर नगारखान्याच्या दुरुस्तीचे काम देखील सुरू झालं आहे..अंबाबाई मंदिरातील या कामाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत पाटील यांनी..पाहुया