लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई भागातील हातगाडेवाले आणि पथविक्रेत्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आणि महापालिका प्रशासनाच्या धोरणाविरोधात लातुरात आज सकाळी अकरा वाजल्यापासून धरणे आंदोलनाला सुरूवात केलीय. शहरातील गंजगोलाई भागात हे आंदोलन करण्यात येत आहे. गंजगोलाईचा संपूर्ण भाग व्यवसायिक झोन झाला पाहिजे, शहरातील हॉकर्स आणि पथविक्रेत्यांना नवीन परवाने देण्यात यावेत, यासह विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.