प्रकाश आंबेडकर यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून, केंद्र सरकारवर थेट हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटलं की, भारत सरकारच्या अधिकृत माहितीनुसार या हल्ल्यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तानची आर्मी सहभागी आहे. मात्र, केंद्रातील राजकीय नेतृत्व कच खातं आहे आणि लष्कर ॲक्शनसाठी तयार असतानाही आदेश दिला जात नाही. आंबेडकर म्हणाले की, जर युद्ध करण्याचा निर्णय घेतला असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने तात्काळ कारवाईचे आदेश द्यावेत.