शहरातील मारुती मंदिर परिसरात आज मुस्लिम समाजाने काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. या निषेध सभेसाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र जमले होते. या निषेध सभेदरम्यान, जमलेल्या नागरिकांनी “पाकिस्तान मुर्दाबाद” च्या घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवला. दहशतवाद्यांना कठोर शासन करून त्यांना धडा शिकवावा, अशी मागणी या समाजाकडून करण्यात आली. यावेळी “भारत माता की जय” च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या सभेत सहभागी झालेल्या नागरिकांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे फलक हातात धरले होते. देशभक्तीच्या भावनेने प्रेरित या निषेध सभेने रत्नागिरी शहरात एकता आणि दहशतवादाविरोधातील संदेश प्रभावीपणे पोहोचवला.