काय नेमकं प्रकरण?
७ जून २०२१ रोजी खानापूर तालुक्यातील भुड येथे ही घटना घडली होती. घरगुती वादातून आरोपीने पत्नी दीपाली कदम यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत पेटवले. त्यांनतर चाकूने गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दीपाली कदम यांचा उपचारादरम्यान ११ जून २०२१ रोजी मृत्यू झाला.
प्रवाशाचा धक्कादायक कारनामा! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग ओढले अन्…; लातुरातील घटना
या प्रकरणी पोलिसांनी महिलेचे भाऊ राहुल सुळे यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी सादर केलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने कठोर निर्णय दिला. आरोपीला मरेपर्यंत आरोपी रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम (41) याला फाशीची शिक्षा तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. या निकालामुळे पीडितेच्या मुलांना न्याय मिळाल्याची भावना पोलिसांनी व्यक्त केली आहे.
शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर
सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतजमिनीच्या हद्दीच्या वादाने बुधवारी हिंसक वळण घेतले. जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आले आणि त्याचे रूपांतर तलवार व दगडांनी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात झाले. या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले असून संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. घडलेली घटना वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी गावातील आहे.
Ans: मरेपर्यंत फाशी आणि ₹1 लाख दंड.
Ans: दिपाली कदम.
Ans: 7 जून 2021 रोजी.






