(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओतील दृश्ये बऱ्याचदा आपल्या कल्पनेपलीडचे ठरतात आणि म्हणूनच फार कमी वेळेत ते व्हायरल होतात. आताही इथे एक हास्यास्पद व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांना चकित केलं. वास्तविक, आपले कोणतेही कपडे फाटले किंवा थोडे उसवले गेले की आपण ते ठीक करण्यासाठी टेलरकडे घेऊन जातो मग तो ते कपडे शिवून देतो. अशात सोशल मीडियावर यासंबंधीचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात व्यक्ती चक्क आपली वीस रुपयांची नोट शिवून घेण्यासाठी टेलरकडे गेल्याचे दिसून येते. आता यात पुढे काय घडले ते चला सविस्तरपणे जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती फटके कपडे घालून टेलरकडे त्याची फाटलेली नोट घेऊन ती शिवण्यासाठी घेऊन जातो. टेलर वेळ न घालवता त्याच्या कारागिरीचे प्रदर्शन करताना दिसतो, तो फाटलेल्या नोटेला पुन्हा शिवून अगदी नवीन दिसण्यासाठी पुन्हा जोडतो. टेलरच्या कौशल्याने तो माणूस खूप आनंदित होतो. त्याला वाटलं की त्याला ही नोट पुन्हा वापरता येईल. पण खरी मजा तेव्हा सुरू झाली जेव्हा त्याने टेलरने शिवणकामाचे शुल्क मागितले. तो ५-१० रुपयांत काम पूर्ण करण्याची आशा करत होता. पण मास्टरच्या उत्तराने तो शॉक झाला.
टेलरने अतिशय गंभीर चेहऱ्याने म्हटले, ” 30 रुपये झाले.” हे ऐकून तो माणूस चकित झाला. २० रुपयांची नोट शिवण्यासाठी ३० रुपये देण्याची कल्पना त्याला पचली नाही. तो आश्चर्याने टेलरकडे पाहत राहिला. त्याचा आनंद दुःखात बदलला आणि या घटनेने सर्वांनाच हसू अनावर झालं. वास्तविक, लोकांच्या मनोरंजनासाठी हा व्हिडिओ तयार केला होता. व्हिडिओतील या अनोख्या कल्पनेने लोक खुश झाले आणि वेगाने व्हिडिओला शेअर करू लागले.
हा व्हायरल व्हिडिओ @comedy_adda0001 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे बापरे, हे तर लेणं ना देणं फुकटचं कंदील लावून येणं झालं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दुःख तर त्याला खूप झालं असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.