(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक मनोरंजक आणि आपण कधीही न पाहिलेले व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज इतके अनोखे असतात की त्यातील दृश्य लगेचच लोकांचे मन वेधते आणि लोक हे व्हिडिओ वेगाने शेअर करू लागतात. इथे फक्त माणसांचेच नाही तर प्राण्यांचेही बरेच व्हिडिओ शेअर केले जातात. प्राण्यांचे हे व्हिडिओज त्यांच्या आयुष्याचे आणि निसर्गाचे वर्णन करते जे पाहणे मजेदार ठरते. आताही इथे एका पोलर बियरचा व्हिडिओ चांगलाच ट्रेंड करत आहे ज्यात तो आपली शक्कल लढवत धोकादायक परिस्थितून सहजतेने बाहेर पडताना दिसून येत आहे.
मानव हा नेहमीच आपल्या बुद्धिमतेसाठी ओळखला जातो पण आपल्याला हे ठाऊक नाही की बऱ्याचदा प्राणीही मानवाच्या एक पाऊल पुढे जाऊन आपली बुद्धिमता सादर करतात. सध्याच्या व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडताना दिसून आले. पोलर बियरने आपल्या बुद्धीचा वापर करून परिस्थितीवर अशी मात केली की पाहून सर्वच थक्क झाले. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
एका पोलर बियरचे व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ माजवत आहे, यात लोकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे दर्शन घडताच लोकांनी त्याची प्रशंसा केली आणि व्हिडिओला 1 मिलियनहुन अधिकचे व्युज मिळाले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक पोलर बियर दिसून येतो जो नेहमीच बर्फाळ प्रदेशात राहतो. बर्फाने व्यापलेल्या या ठिकाणी पोलर बियर दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करत असतो पण मधला रस्ता हा जरा कमकुवत असतो म्हणजेच इथे बर्फाचा एक पातळ थर असतो ज्यावर चालताच तो तुटण्याची शक्यता असते. अशात पोलर बियर आपली शक्कल लढवतो आणि चालत नाही तर रेंगाळत जमिनीवर कमी वजन टाकत हा मधला रस्ता पार करतो. रस्ता पार करताच तो आपल्या पायांनी चालायला सुरुवात करतो आणि तिथून निघून जातो. व्हिडिओमध्ये काही विशेष नसले तरी पोलर बियरने लढवलेला हा जुगाड आता सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. विचार करून त्याने उचलेले हे पाऊल लोकांना पटवून देत आहे की प्राण्यांमध्येही बुद्धिमत्ता दडलेली असते.
Polar bear slides across thin ice to avoid breaking it.
Proof that animals are way smarter than we think! pic.twitter.com/KCheIGVFgW
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) September 7, 2025
दरम्यान हा व्हिडिओ सध्या वेगाने इंटरनेटवर व्हायरल होत असून @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवर त्याला शेअर करण्यात आलं आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘ध्रुवीय अस्वल बर्फ तुटू नये म्हणून पातळ बर्फावरून सरकतो. प्राणी आपल्या विचारापेक्षा खूपच हुशार आहेत याचा पुरावा!’ असे लिहिण्यात आले आहे. तसेच अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत व्हिडिओतील दृश्यांवर आपले मत देखील व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मला त्याचा त्या बर्फावरून सरकण्याचा आवाज ऐकायचा आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण ध्रुवीय अस्वलाला कोणी मूर्ख म्हटले आहे?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.