(फोटो सौजन्य: X)
हवेत अडकलेल्या 300 पर्यटकांसाठी जवान ठरले देवदूत! जीव धोक्यात घालून केलं थरारक रेस्क्यू; Video Viral
काय आहे प्रकरण?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो यात दिसते की, रात्रीच्या सुमारास महिला आपल्या घराबाहेर रस्त्यावर उभी असते. याचवेळी काही लोक तिच्या दिशेने काठी घेऊन येतात आणि महिलेला काही समजेल याआधीच ते तिला काठाने मारायला सुरुवात करतात. एक व्यक्ती महिलेच्या डोक्यावर काठीने प्रहार करतो ज्यानंतर ती जमिनीवर पडते. महिला वेदनेने कळवळत त्यांच्याकडे दयेची विनवणी करते पण कुणीही तिच काही ऐकत नाही आणि एकामागून एक तिच्यावर काठीने प्रहार केला जातो. या घटनेत महिलेला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
मध्य प्रदेश के शिवपुरी से एक वीडियो वायरल हो रहा है. जिसमें दबंग गुंडे लड़की को पीट पीट कर मरणासन्न अवस्था में कर दिए हैं।
लड़की का नाम आरती प्रजापति बताया जा रहा है। सुना है शिवपुरी जिले में नई एसपी साहिबा आयीं हैं।
जिन्हें लेडी सिंघम के नाम से जाना जाता है. pic.twitter.com/lUGWI1YEtu — Arun Banpuri (@BanpuriArun) May 27, 2026
पिडित महिलेचे नाव आरती प्रजापती असून तिला या मारहाणीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हाणामारीचे मूळ कारण हे जुने वैर असल्याचे स्पष्ट झाले आहे. माहितीनुसार, आरतीने अलिकडेच आरोपींवर गंभीर आरोप केले होते. तिने प्रशासनाकडे आपल्या जीवाला धोका असल्याची भिती व्यक्त केली होती. ज्या लोकांची तिला भिती होती त्याच लोकांनी तिला मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी आता तीव्र संताप व्यक्त केला आहे. तक्रार करुनही महिला भीषण हल्ल्याची बळी पडली ज्यामुळे सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत असून आरोपींवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई होण्याची आशा आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






