'पाकडे नेहमीच हारतात,...' ; टीम इंडीयाच्या छोट्या चाहत्याचा पाकिस्तानला टोला; नेटकऱ्यांनी केली वाहवा, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
IND vs PAK : लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानची सर्वत्र नाचक्की होत आहे. पाकिस्तानचे नागरिक त्यांच्या खेळाडूंवर संतापवले आहे. तर भारतात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारताने ५ विकेट्सने पाकिस्तानचा परभाव केला आहे. केवळ एकदा नाही तर नवव्यांदा भारताने विजेतेपद पटकावले आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी सध्या सणाचे वातावरण आहे. देशभरात गल्ली-बोळात ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला जात आहे.
याच वेळी भारताच्या एका छोट्या क्रिकेट चाहत्याने पाकिस्तानला असा टोला लगावला आहे की, सगळीकडे हास्याचा स्फोट उडाला आहे. या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहे, तर अनेकांनी त्याच्या या व्यक्तव्याची मज्जा लुटली आहे. रायपूरमधील एका गोंडस चिमुकल्याने केलेले व्यक्तव्य ऐकून तुम्ही देखील खळखळून हसाल.
या छोट्या चिमुकल्याला जेव्हा रिपोर्टरने सामना जिंकल्यावर कसे वाटत आहे विचारले. यावेळी चिमुकल्याने दिलेले उत्तर ऐकूम रिपोर्टरही गप्प झाला आहे. चिमुल्याने आनंदाने उड्या मारत म्हटले की, पाकिस्तानला हारयचेच होते, ते नेहमीच हारत असतात. चिमुकल्या एवढ्यावरच थांबला नाही, तर पाकिस्तानला सल्ला देत पाकिस्तान, काही तरी करुन दाखवा असे म्हटले आहे. सध्या या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर गोंधळ घालत आहे. हा व्हिडिओ भारतीय नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
व्हायरल व्हिडिओ
#WATCH | Raipur, Chhattisgarh | A young fan of the Indian Cricket Team says, “India defeats Pakistan every time. ‘Aree Pakistan kuch toh kar ke dikha’…” https://t.co/qiejhbxzGE pic.twitter.com/KjgXEQeGUM — ANI (@ANI) September 28, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने @ANI या अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भारताचे भविष्य चांगल्या हातात आहे, कराण असे फॅन्स आहेत, तर दुसऱ्या एका युजरने छोट्या ने आफ्रिदीचे तोंड पाहून थूकला असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने अरे थू… पाकिस्तान अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.
IND vs PAK : आशिया कप हारताच पाकिस्तानची उडाली खिल्ली; सोशल मीडियावर Memes चा पाऊस
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.