(फोटो सौजन्य: Instagram)
भारताचा शेजारील देश पाकिस्तानमधून अनेक अजब-गजब व्हिडिओज नेहमीच सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात तर कधी धक्का देतात. पण नुकताच सोशल मिडियावर एक विचित्र प्रकार व्हायरल झाला आहे जो पाहून तुम्हीही तुमच्या डोक्याला हाथ लावाल. व्हिडिओमध्ये पाकिस्तानमधील एक डाॅक्टर वृद्ध महिलेच्या पाठदुखीवर उपचार करण्यासाठी चक्क तिच्या पाठीवरच जाऊन उभा राहिल्याचे दिसून आले. मुख्य म्हणजे यानंतर असं काही घडलं की ज्याने महिलेची पाठदुखी तर ठिक नाही झाली पण तिच्या शरीरातील सर्व हाडे नक्कीच खिळखिळी झाली. लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाकिस्तानमधील असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात आपण पाहिले तर दिसते की, एक वृद्ध महिला पाठदुखीवर उपचार घेण्यासाठी डॉक्टरकडे आली आहे. व्हिडिओमध्ये महिलेला ग्लुकोजची बाटली चढवल्याचेही दिसून येत आहे. आता इथपर्यंत सर्वकाही ठिक असतानाच पुढे धक्कादायक गोष्ट घडून येते ज्याने सर्वच हादरुन जातात. वृद्ध महिलेची पाठदुखी ठिक करण्यासाठी पुढच्याच क्षणी डाॅक्टर तिला बेडवर लेटवून तिच्या पाठीवर उभा राहतो. परिणामी बेड क्षणातच जमिनीवर कोसळतो आणि बेडसोबतच वृद्ध महिला आणि डाॅक्टरही खाली पडतात. महिलेची अवस्था पाहून नक्कीच तिची हाडे तुटल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. या घटनेमुळे महिलेला नक्कीच जीवंतपणीच यमाचे दर्शन झाले असावे. यूजर्स व्हिडिओतील ही सर्व दृश्ये पाहून थबकले असून याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.
पाण्यामध्ये झाली भयानक लढाई, मगरीच्या जबड्यात अडकला अजगर; थरारक दृश्ये अन् पुढे जे घडलं… Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @surajkr9900 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 4 हजाराहून अधिकच्या व्युज मिळाल्या असून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे AI आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “संपल सगळं आता टाटा गुडबाय” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बिचारी आज्जी, तिला किती वेदना झाल्या असाव्यात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






