(फोटो सौजन्य – Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक अजब-गजब गोष्टी व्हायरल होत असतात. इथे तुम्हाला अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतील ज्यांचा तुम्ही स्वप्नातही कधी विचार केला नसेल. वास्तविक, कुणाचे निधन झाले की अंत्ययात्रा काढली जाते. यावेळी सर्वत्र दुःखाचे वातावरण असते, लोक व्यक्तीच्या जाण्याचे दुःख व्यक्त करतात. यावेळी व्यक्तीची अंतिम यात्रा म्हणजेच अंत्ययात्रा काढली जाते. तुम्ही आजवर अनेक अंत्ययात्रा पाहिल्या असतील ज्यात सहसा लोक, राम नामाचा जप करतात मात्र डीजेच्या तालावर नाचत निघालेली अंत्ययात्रा तुम्ही कधी पाहिली आहे का?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोक अंत्ययात्रेत डीजेच्या तालावर नाचताना दिसून आले. हे दृश्य सर्वांसाठी फार नवे आणि धक्कादायक आहे ज्यामुळे याचा व्हिडिओ शेअर होताच मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अंत्ययात्रेत लोक नाचताना आणि गाताना दिसत आहेत. यावेळी डीजेवर मोठ्या आवाजात गाणीही वाजवली जात आहेत. व्हिडिओमध्ये लोक भोजपुरी गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत. मृतदेह खांद्यावर घेऊन जाणारे लोक डीजेच्या तालावर नाचताना दिसतात.
व्हिडीओतील वातावरण असे दिसते की जणू काही ही अंत्ययात्रा नसून आनंदाचा प्रसंग आहे. आता त्यांनी असे का केले आणि हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत मात्र अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. युजर्सना मात्र या व्हिडिओने आता हादरवून सोडले आहे. व्हिडिओमध्ये सध्या सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले असून अनेकजण यावर आपल्या प्रतिक्रिया वयात करत आहेत.
काका… काका आहेत का? कावळा बोलतोय मधुर वाणी, बोलणारा कावळा कधी पाहिला आहे का? मजेदार Video Viral
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @krambali320 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “देव पण घाबरला असेल आता तर नक्कीच स्वर्ग मिळणार” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मृत्यू हा सण म्हणून साजरा करणे ही बिहारची परंपरा आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






