(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक नवनवीन गोष्टी शेअर केल्या जातात. लोक व्हायरल होण्यासाठी इथे अनेक नको ते प्रकार करू पाहतात. कधी स्टंट, कधी जुगाड तर कधी इथे काय दिसेल याचा नेम नाही. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर असे हे व्हायरल व्हिडिओज तुम्ही अनेकदा इथे पाहिले असतील. त्यातच आता इथे एक अनोखा आणि सुंदर व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात काही फ्रेंच लोक नाचताना दिसून येत आहे. आता त्यांचा हा डान्स इतका लोकप्रिय का झाला तर याचे कारण म्हणजे व्हिडिओतील गाणं! वास्तविक, हे फ्रेंच लोक कोणत्या फ्रेंच गाण्यावर नाही तर आपल्या मराठी कोळी गाण्यावर थिरकताना दिसून आले. व्हिडिओतील त्यांचा उत्साह लक्षवेधी ठरला आणि लोकांनी हा व्हिडिओ डोक्यावर नाचवला. कोळी गाण्याला फ्रेंचमध्ये मिळालेली ही लोकप्रियता पाहून अनेकांचा ऊर भरून आला आणि लोकांनी वेगाने हा व्हिडिओ शेअर करण्यात सुरुवात केली. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
भयानक दिसणाऱ्या बाहुल्यांनी जगाला घातलीये भुरळ! ‘Labubu Doll’ आवडण्याचे नक्की कारण काय?
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओ हा फ्रेंचमधील एका ऑफिसमधला आहे. ऑफिसमध्ये लंच ब्रेक झाला असता कर्मचाऱ्यांनी या मोकळ्या वेळेत कोळी गाण्यावर नृत्य करत आपला थकवा घालवण्याचा निर्णय घेतला आणि जसे हे गाणे वाजले कुणालाही या गाण्यावर नाचण्याचा मोह आवरता आला नाही. व्हिडिओमध्ये आपण ऐकले तर यामध्ये ‘बागेचा कोण माळी’ हे कोळी गाणं वाजत होतं. कोळी-फ्रेंचचे हे अनोखे संमिश्र आता युजर्सना भुरळ घालत आहे. कोळी संस्कृतीला फ्रेंचमध्ये मिळालेली ही दाद पाहून अनेकजण सुखावून गेले आहेत. लोक वेगाने हा व्हिडिओ आता वेगाने शेअर करत आहेत तर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.
हा व्हायरल व्हिडिओमध्ये @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बाहेरच्या लोकांना आपली भाषा परंपरा गाणी आवडतात नि आपल्या महाराष्ट्रत हिंदी सक्तीची” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “साडीवाल्या ताईने तर कमालच केली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खूप छान वाटलं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.