(फोटो सौजन्य: X)
प्राणी असो, पक्षी असो वा मानव… पृथ्वीवरील कोणत्याही जिवाच्या मनात भावना मात्र सारख्याच असतात. लहान मुले ही नेहमीच खोडसर आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याच्या उत्सुकतेत असतात आणि यासंबंधीचाचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात बिबट्याच्या बाळाला एका वन अधिकाऱ्याने कारची सफर दिल्याचे दृश्य दिसून आले. पहिल्यांदाच कारमध्ये बसल्यामुळे तो फार उत्सुकतेने जशी सर्व लहान मुले खिडकी पकडतात अगदी तसाच गाडीची खिडकी आपल्या नावावर करतो आणि खिडकीतून बाहेरचे सर्व दृश्य उत्सुकतेने पाहू लागतो. निष्पाप पिल्लाचा हा क्षणभराचा आनंद आणि त्याच्या चेहऱ्यावरील रिॲक्शन, त्याचा आनंद पाहून आता युजर्स सुखावून गेले आहेत. हा व्हिडिओ आता वेगाने शेअर केला जात असून यात नक्की काय घडलं ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
काय घडलं व्हिडिओत?
हा व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील कोटखाई थारोला येथील आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गाडी चालवताना दिसून येत आहे आणि यावेळी त्याच्या सोबत गाडीत एक बिबट्याचं पिल्लू देखील नजरेस पडत आहे. गाडीच्या खिडकीतून बाहेर डोकावणारा आणि सीटवर खेळणारा हा निष्पाप पिल्ला इंटरनेटवर आता चांगलाचा व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात बिबट्याचे पिल्लू खिडकीला पकडून बाहेरच्या दृश्यांची मजा लुटताना दिसून आलं आणि जेव्हा ही दृश्ये पाहून त्याच मन भरतं तेव्हा तो गप्प गाडीच्या सीटवर जाऊन बसतो. पिल्लाची उत्सुकता आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आता सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लोक बिबट्याच्या मुलाला असा नवा अनुभव घेताना पाहून चांगलेच खुश झाले आहेत तर काही मुलाच्या आईसाठी चिंता व्यक्त करत आहेत. व्यक्तीने असे बिबट्याला जंगलातून उचलणे युजर्सना पटले नसून व्हिडिओला अनेक संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
Kotkhai Tharola resident Ankush Chauhan, on finding a leopard cub, personally took it to Theog DFO. Good to see humanity still alive, as such rare animals are often killed for their teeth and skin. pic.twitter.com/dWWHCkYFJM
— Nikhil saini (@iNikhilsaini) August 9, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @iNikhilsaini नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो खूप क्युट आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कदाचित आई जेवण आणण्यासाठी बाहेर गेली असेल आणि या माणसाने त्याला पळवून नेले असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जंगल मागे जात आहे हे पाहून मुलगा चिंताग्रस्त आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.