(फोटो सौजन्य: Instagram
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला अनेक वेगवेगळे व्हिडिओज पाहायला मिळतील. इथे असे अनेक व्हिडिओ शेअर केले जातात, ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. इथे थरारक तसेच काही मनमोहक व्हिडिओही शेअर होतात जे कमी वेळातच लोकांची मने जिंकतात. आताही इंटरनेटवर एका चिमुकलीचा क्युट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, यातील मनमोहक दृश्ये निश्चितच तुम्हाला सुखावून जाईल. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
जगात प्राणीप्रेमी खूप आहेत. अनेकजण आपल्या घरात प्राण्यांना पाळतात आणि यातीलच एक लोकप्रिय आणि सर्वांच्या आवडीचा प्राणी म्हणजे कुत्रा. कुत्र्याला सर्वात प्रामाणिक प्राणी मानले जाते, ज्यामुळे अनेकजण आपल्या घराची रखवाली करण्यासाठी त्याला पाळतात. दरम्यान सोशल मीडियावर एक कुत्रा आणि चिमुकलीचा सुंदर व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये एक चिमुकली चक्क कुत्र्याच्या पाठीवर बसून रस्ता ओलांडताना दिसून आला. मुख्य म्हणजे यावेळी कुत्र्यांचा संपूर्ण स्कॉड त्यांचे रक्षण करताना दिसला जे पाहणे खरोखर मजेदार होते.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ती मुलगी अनेक भटक्या कुत्र्यांसह रस्त्यावर चालत आहे. ती त्या कुत्र्यांपैकी एकावर बसली आहे. तिला पाहून असं वाटतंय की ही त्याचीच राईड करत आहे आणि यावेळी बाकीचे कुत्रे त्याच्याभोवती अंगरक्षकांसारखे फिरताना दिसतात. अखेर रस्ता क्रॉस केल्यानंतर ती मुलगी काही वेळ कुत्र्यावरून खाली उतरते, पण फूटपाथ ओलांडल्यानंतर ती पुन्हा जाऊन कुत्र्यावर बसते. त्या दोघांमधील हा अनोखा बॉंड अनेकांना सुखावून जातो आणि लोक हे दृश्य वेगाने शेअर करू लागतात.
हा व्हायरल व्हिडिओ @bollywindow नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘Z+ सिक्याॅरीटीसह VIP एंट्री’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हजारो लोकांनी याला लाइक्स दिले आहेत. यासोबतच अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केली आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कोणीतरी मुलीला प्रामाणिक सुरक्षा पुरवत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप सुंदर”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.