(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवगेळे आणि अनोखे व्हिडिओज व्हायरल होत असतात. व्हिडिओतील दृश्य बऱ्याचदा आपल्या कल्पनेपलीडचे असतात ज्यामुळे ते नेहमीच युजर्सना थक्क करून जातात. आताही इथे असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांनाच घाबरवून ठेवले आहे. व्हिडिओतील ही थरार दृश्ये कोणत्या भयपटापहून कमी नाहीत. मात्र काल्पनिक वाटणारी ही गोष्ट सत्यात घडली आहे आणि याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चला व्हिडिओत नक्की काय दिसले याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
‘भारतात जाऊ नका…’, असे का म्हणाली अमेरिकन इन्फ्लुएन्सर? VIDEO पाहून कळेल सत्य
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात, एक व्यक्ती एका नदीतून बोट चालवताना दिसून येत आहे. मात्र ही बोट साधीसुधी नव्हे तुम्ही यात नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल की या नदीत शेकडो मगरी पोहत आहेत आणि मगरींनी भरलेल्या या नदीतून व्यक्ती आपली बोट चालवत आहे. व्हिडिओतील हे दृश्य सामान्य नसून आता हे अनेकांना आश्चर्याचा धक्का देत आहे. व्हिडिओमध्ये काही मगरी पाण्यात अर्ध्या बुडलेल्या दिसतात, तर काहींच्या शेपट्या पाण्याच्या पृष्ठभागावर हालताना दिसतात.
व्हिडिओमधील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे भयानक दृश्य पाहूनही बोट चालवणारा माणूस घाबरला नाही. तो बोट अशा प्रकारे चालवत होता जणू काही हा त्याचा रोजचा दिनक्रम आहे. यावेळी मगरीही व्यक्तीवर हल्ला करत नाही आणि निपचित पाण्यात पोहत राहतात. व्हिडिओतील हे दृश्ये इतके भयानक वाटू लागतात की त्यांना पाहताच आपल्या अंगावर काटा येईल. याचा व्हिडिओ व्हायरल होताच आता काहीजण व्यक्तीच्या धाडसाचे कौतुक करत आहेत तर काही त्याच्या या पराक्रमाला निव्वळ वेडेपणा मानत आहेत.
कॅनडात पदवी समारंभात भारतीय विद्यार्थ्याचा ‘शंकर भगवान की जय’ चा नारा; VIDEO तुफान व्हायरल
हा थरारक व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मगरी त्याला काही करत का नाहीत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावाला यमराजाला पाहण्याची फार इच्छा होत असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे भयानक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.