विद्यार्थ्यांना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल (फोटो- ट्विटर)
छत्रपती संभाजीनगरमध्ये गतिमंद मुलांना मारहाण
चैतन्य कानिफनाथ मतिमंद विद्यालयातील घटना
मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Crime News: सध्या आपण सोशल मिडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहत असतो. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला कधी आनंद, दु:ख, चीड येईल असे व्हिडिओ असतात. दरम्यान असाच एक चीड आणणारा व्हिडिओ महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मांडकी गावातील ही घटना असून, याबाबतचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील मांडकी गावात हृदयद्रावक घटना घडली आहे. एका शाळेत गतिमंद मुलांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तसेच संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल व्हिडिओ आणि शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमुळे गतिमंद मुलांना मारहाण करतानाच व्हिडिओ समोर आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये (मांडकी) गतीमंद मुलाला शाळेत हातपाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली. लोखंडी तव्याने त्याला मारहाण केली जात होती आणि तो चिमुकला किंचाळत होता. सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. #chhatrapatisambhajinagar #MaharashtraNews #CrimeNews pic.twitter.com/v0SRhqc4wZ — Simran G. (@noonecanbeat142) November 3, 2025
या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. शाळेतील मुलांचे हातपाय बांधून ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुलाचे हात पाय बांधल्याचे दिसून येत आहे. होणाऱ्या वेदनेने मुलगा ओरडत आहे. दरम्यान या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मंत्री अतुल सावे यांनी याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मद्यधुंद डंपर चालकाने कारला ठोकले
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. यामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. हरमाडा भागात अनियंत्रित डंपरने रस्त्यावर मृत्यूतांडव केले आहे. डंपर चालकाने अनेकांना ठोकले आहे. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजते आहे.
डंपर रस्त्यावर अनियंत्रित झाल्याने त्याने अनेकांना उडवले आहे. यामध्ये आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. सर्वात पहिल्यांदा डंपरने एका कारला धडक दिली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
जयपुर में यमराज बनकर सड़क पर उतरा डंपर! 60 से ज्यादा लोगों को रौंदा, 19 की हुई मौत इस CCTV वीडियो को देखकर कांप जाएगी रूह#JaipurNews #Rajasthan #RoadAccident pic.twitter.com/0ADkFT7MNV — अभिषेक 'अजनबी' ✍🏻 (@abhishekAZNABI) November 3, 2025
डंपरने अनेक जणांना चिरडले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमी नागरिकांना जवळील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.






