(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक विचित्र आणि थक्क करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील दृश्ये बऱ्याचदा आपल्या कल्पनेपलीकडची ठरतात. आताही एक असाच व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे ज्यात एक विषारी साप चक्क मॅगी नूडल्स खाताना दिसून आला. होय, खोटी वाटणारी ही दृश्ये खरी असून याचा व्हिडिओ आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आहे. व्हिडिओतील सापाच्या करामती तुम्हाला थक्क तर करतीलच पण तुमच्या चेहऱ्यावर हसूही आणतील. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
साप हा मुळातच जंगलातील विषारी प्राणी म्हणून ओळखला जातो. त्याचे विष कुणालाही मृत्यूच्या घरी पोहचवू शकते. अशातच सापाचा एक मजेदार व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात तो जंगलातून बाहेर येत शहरातील एका घरात घुसून थेट मॅगी नूडल्सचा आस्वाद घेताना दिसून आला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक साप एका स्वयंपाकघरात घुसून गॅसवर चढत कढईतील नूडल्स चाखताना दिसून आला. हे दृश्य पाहून लोकांनी त्याला मॅगी लाव्हरची उपमा दिली. व्हिडिओमध्ये आजकाल बुडून खाण्यात तितकी मजा नाही असे लिहीत सापाच्या या कृत्याची खिल्ली उडवली आहे. सापाचे हे मॅगी प्रेम आता युजर्सना चांगलेच थक्क करत असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पुणेकरांचा नाद नाही! अंगापेक्षा बोंगा नंबर प्लेट लावत मारली गावभर फेरी, Video Viral
दरम्यान सापाचा हा व्हिडिओ @funtaap नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नशाब्बास” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याचा सुगंध इतका चांगला आहे की थेट साप त्याची चव घेण्यासाठी आला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हा खरा मॅगी लाव्हर”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.