Iran US Conflict : अमेरिकेचं सत्य उघडं! इराणच्या हल्ल्यात २२८ लष्कीर तळं उद्ध्वस्त? सॅटेलाईट फोटोंमुळे जगभरात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या रिपोर्टनुसार, इराणने अमेरिकेच्या तब्बल २२८ लष्करी तळांना आणि युद्धसामग्रीला उद्ध्वस्त केले आहे. याचे सॅटेलाईट फोटो वॉशिंग्टन पोस्टने शेअर केले आहेत. इराणने अत्यंत रणनीतिक पद्धतीने अमेरिकेचा कणा मोडला आहे.
Exclusive: Iranian strikes have hit at least 228 structures or pieces of equipment at U.S. military sites since the war began, a Post analysis of satellite imagery reveals.The destruction is far greater than what was previously reported or acknowledged by the U.S. government.… pic.twitter.com/CkcfoWT6NB — The Washington Post (@washingtonpost) May 6, 2026
वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार, ट्रम्प सरकार जाणीवपूर्वक नुकसानीचे आकडे कमी सांगत आहे. सैन्याचे मनोबल खचू नये आणि जागतिक स्तरावर नाचक्की होऊ नये यासाठी माहिती लपवली जात आहे. परंतु युद्धात शेकडो सैनिकांनी प्राण गमावले असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. इराणने केवळ अमेरिकेच्या आर्थिकच नाही, लष्करी सामर्थ्यांचेही मोठे नुकसान केले आहे.
US Iran Conflict : युद्ध थांबले? ट्रम्प यांनी इराणविरोधी लष्करी मोहिम थांबवली, दिला ‘हा’ कडक इशारा






