'मी घाबरलो आहे!' ब्रिटिश संसदेत घुमला बांगलादेशी हिंदूंचा आक्रोश; युनूस सरकारला ब्रिटनचा कडक इशारा, पाहा काय घडले? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Bangladesh Hindu violence British Parliament debate : बांगलादेशात (Bangladesh) हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर सुरू असलेल्या हिंसाचाराचे पडसाद आता सातासमुद्रापार उमटले आहेत. ब्रिटिश (Britain) संसदेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये या विषयावर अत्यंत गंभीर चर्चा झाली, ज्यामध्ये लोकप्रतिनिधींनी बांगलादेशातील परिस्थितीला “विनाशकारी” (Disastrous) असे संबोधले. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी मांडलेल्या प्रस्तावाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले असून, युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर आता मोठा आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण झाला आहे.
खासदार बॉब ब्लॅकमन यांनी संसदेत अत्यंत विदारक चित्र मांडले. ते म्हणाले, “मी घाबरलो आहे, कारण बांगलादेशातील हिंदूंची रस्त्यावर निर्घृण हत्या केली जात आहे. त्यांची घरे पेटवून दिली जात आहेत आणि मंदिरांची विटंबना सुरू आहे.” ब्लॅकमन यांनी चिन्मय प्रभू यांची अटक आणि दीपू दास यांची झालेली हत्या (Lynching) यांचा विशेष उल्लेख करत, बांगलादेशातील धार्मिक स्वातंत्र्याचा गळा घोटला जात असल्याचे सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UK PM News: ब्रिटनमध्ये नवा वाद! धोरणात्मक अपयश झाकण्यासाठी स्टारमर यांचा ‘कामसूत्र’ ड्रामा; पाहा VIRAL VIDEO
केवळ हिंसाचारच नाही, तर बांगलादेशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या विश्वासार्हतेवरही ब्रिटनने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमधून सर्वात मोठा राजकीय पक्ष ‘अवामी लीग’ला वगळण्यात आले आहे. “३० टक्के जनतेचा पाठिंबा असलेल्या पक्षाला निवडणूक लढवण्यापासून रोखणे, हे लोकशाहीच्या विरोधात आहे,” असे मत ब्लॅकमन यांनी व्यक्त केले. तसेच, इस्लामिक कट्टरतावादी देशाचे संविधान बदलण्यासाठी जनमत चाचणीची मागणी करत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
#BREAKING: British MP @BobBlackman raises concerns in British Parliament over killing of Minority Hindus and burning of temples in Bangladesh. He also raised concerns on ban on Awami League ahead of elections. Asks Yunus Govt to protect minorities, ensure free and fair elections. pic.twitter.com/1xxjPVQikD — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 15, 2026
credit – social media and Twitter
भारतीय वंशाच्या खासदार आणि छाया परराष्ट्र सचिव प्रीती पटेल यांनी या प्रकरणी थेट हस्तक्षेप केला आहे. त्यांनी परराष्ट्र सचिव यवेट कूपर यांना पत्र लिहून, बांगलादेशात हिंदूंच्या सुरक्षेसाठी ब्रिटनने आपल्या राजनैतिक अधिकारांचा वापर करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, लंडनमध्ये ‘बंगाली हिंदू आदर्श संघ’ (BHAS) आणि इतर प्रवासी संघटनांनी बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर मोठी निदर्शने केली. “हिंदूंचे आयुष्य महत्त्वाचे आहे” (Hindu Lives Matter) अशा घोषणांनी लंडनचा परिसर दणाणून गेला होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Poseidon Drone: पुतिनकडे आहे पाण्याखालील प्रलयकाळाचा अग्रदूत; जो कुठेही आणू शकतो 500 फूट उंचीची त्सुनामी, वाचा खासियत
ब्रिटीश सरकारने या वादावर अधिकृत भूमिका मांडताना सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. हाऊस ऑफ कॉमन्सचे नेते अॅलन कॅम्पबेल यांनी स्पष्ट केले की, ब्रिटन सरकार मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारशी सतत संपर्कात आहे. “धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करणे ही सरकारची पहिली जबाबदारी आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुका पारदर्शक आणि सर्वसमावेशक असाव्यात, यासाठी आम्ही दबाव टाकत राहू,” असे आश्वासन त्यांनी दिले.
Ans: बांगलादेशात हिंदूंची होणारी हत्या, मंदिरे जाळणे आणि फेब्रुवारी २०२६ च्या निवडणुकांमधून प्रमुख पक्षांना वगळणे यावर चर्चा झाली.
Ans: त्यांनी युनूस सरकारने हिंदूंचे रक्षण करावे आणि फेब्रुवारीमध्ये पारदर्शक व सर्वसमावेशक निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली आहे.
Ans: 'बंगाली हिंदू आदर्श संघ' (BHAS) आणि भारतीय प्रवासी संघटनांनी लंडनमध्ये बांगलादेश सरकारविरोधात निदर्शने केली.






