बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार सुरुच! पेट्रोलचे पैस मागितले म्हणून तरुणाला कारने चिरडलं, भयावह VIDEO
हिंदूंना वोट देणं हराम… बांगलदेशात निवडणुकीपूर्वी मौलवींचे चिथावणीखोर विधान, VIDEO VIRAL
मिळालेल्या माहितीनुसार, राजबाडी जिल्ह्यात एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या ३० वर्षीय रिपन साहा या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा बांगलादेशातील हिंदू समुदायाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच यामुळे हिंदू समुदायाच्या लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पेट्रोल पंपावर दोन व्यक्ती आपली कार घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आले होते. पण पेट्रोल भरल्यानंतर चालकाने पैसे न देताचा पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु रिपनने त्यांना पकडले आणि पेट्रोलचे पैसे मागितले. यावर चालकाने संतापून रिपनला आपल्या कारने चिरडलं. रिपन गाडीच्या समोर उभा होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारचे मालक अब्दुल हाशिफ उर्फ सुजान आणि चालक कमाल हुसैन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी हत्या करण्यात आलेली एसयूव्ही कारही जप्त केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही फुटेडही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या भयावह व्हिडिओने अनेकांचा थरकाप उडला आहे.
बांगलदेशात हिंदूंच्या हत्येची ही पहिलीच घटना नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर कट्टरपंथी गटांकडून हिंसाचार होत आहे. ईशनिंदाच्या आरोपाखाली, हिंदू व्यक्तींना जबरदस्तीने अटक केली जात आहेत. मारहाण करुन त्यांना जिवंत जाळले जात आहे. गेल्या वर्षी फक्त डिसेंबर महिन्यात हिंदू अत्याच्याराच्या ५१ घटना नोंदवण्यात आल्या होत्या.
काही दिवसांपूर्वीच ५ जानेवारी २०२६ रोजी जशोरमध्ये हिंदू पत्रकार राणा प्रताप बैरागी यांची गोळ्या झाडून आणि गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. याशिवाय डिसेंबर २०२५ मध्ये दिपू चंद्र दास याची ईशनिंदाच्या खोट्या आरोपाखाली कट्टरपंथी जमावाने हत्या केली होती. तसेच आणखी एका हिंदू तरुणाला मारहाण करुन जिंवत जाळण्यात आले होते.
राइट्स अँड रिस्क अनालिसिस ग्रुप (RRAG) च्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी पर्यंत १५ हिंदूंच्या हत्येच्या घटना घडल्या आहे. या हिंसक घटनांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र विरोध केला जात आहे. भारताने देखील हिंदूवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. ब्रिटनने देखील या घटनांचा तीव्र निषेध केला आहे.
Bangladesh: Hindu Petrol Pump Worker Killed; BNP Leader Arrested – Violence against minorities continues in Bangladesh. A Hindu youth, Ripon Saha (30), was brutally killed in Rajbari district. – Ripon worked at Karim Filling Station. He was deliberately run over by a car after… pic.twitter.com/qEh1fkNCs1 — Ritam English (@english_ritam) January 17, 2026
Ans: बांगलादेशात पुन्हा हिंदू समुदायच्या ३० वर्षीय रिपन साहा या तरुणाची निघृण हत्या करण्यात आली आहे.
Ans: रिपन पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या कार चालकाला पेट्रोलचे पैस मागितले होते. परंतु चालक पैसे न देताचा पळून जाणार होता. यावेळी रिपन कारच्या समोर जाभन त्यांना थांबवले आणि पैस मागितले. यामुळे संतापून कार चालकाने रिपना गाडीखाली चिरडले.
Ans: राइट्स अँड रिस्क अनालिसिस ग्रुप (RRAG) च्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी पर्यंत १५ हिंदूंच्या हत्येच्या घटना घडल्या आहेत.






