LPG Prices: तेलाच्या संकटातही 'या' देशांमध्ये सर्वात स्वस्त LPG उपलब्ध; जाणून घ्या यामागील कारण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Cheapest LPG prices in world 2026 : सध्या संपूर्ण जग ऊर्जेच्या संकटाचा सामना करत आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल तणावामुळे (US-Israel Iran War) कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अनेक देशांमध्ये सामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर खरेदी करताना खिशाला मोठी कात्री लागत आहे. मात्र, या जागतिक हाहाकाराच्या काळातही जगात असे काही देश आहेत, जिथे एलपीजी (LPG) ची किंमत ऐकून तुम्हाला स्वतःच्या कानांवर विश्वास बसणार नाही. या देशांमध्ये गॅस अक्षरशः पाण्याच्या बाटलीपेक्षाही स्वस्त दरात विकला जात आहे.
जागतिक आकडेवारीनुसार, अल्जेरिया हा जगातील असा देश आहे जिथे एलपीजीचे दर सर्वात कमी आहेत. येथे प्रति लिटर गॅससाठी केवळ ७ ते ९ रुपये खर्च करावे लागतात. त्यापाठोपाठ अंगोला, कतार, कुवेत आणि कझाकस्तान या देशांचा क्रमांक लागतो. कझाकस्तानमध्ये हेच दर १८ ते २२ रुपयांच्या आसपास आहेत. भारतासारख्या देशात जिथे गॅस सिलेंडरच्या किमती ₹८०० ते ₹११०० च्या दरम्यान असतात, तिथे हे दर थक्क करणारे आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dark Shipping : अन् रडारवरून गायब…! होर्मुझच्या नाकेबंदीतून कसे निसटत आहेत टँकर ? जाणून घ्या त्यामागील तंत्रज्ञान आणि रहस्य
१. नैसर्गिक वायूचे मुबलक साठे:
अल्जेरिया, कतार आणि सौदी अरेबिया यांसारख्या देशांमध्ये नैसर्गिक वायूचे अथांग साठे आहेत. एलपीजी हा नैसर्गिक वायूवर प्रक्रिया करूनच बनवला जातो. ज्या देशांकडे स्वतःचे उत्पादन आहे, त्यांना तो इतर देशांकडून आयात करावा लागत नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक, विमा आणि डॉलर्समधील देवाणघेवाणीचा खर्च वाचतो.
२. प्रचंड सरकारी अनुदान (Government Subsidy):
इराण आणि इंडोनेशियासारख्या देशांमध्ये सरकार आपल्या नागरिकांना स्वस्त इंधन मिळावे म्हणून तिजोरीतून मोठा हिस्सा खर्च करते. इराण हा जगातील सर्वात जास्त ऊर्जा अनुदान देणाऱ्या देशांपैकी एक आहे. यामुळे जागतिक बाजारात किमती वाढल्या तरी तिथे स्थानिक नागरिकांवर त्याचा परिणाम होत नाही.
३. किंमत नियंत्रण प्रणाली:
भारत किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये इंधनाचे दर दररोज जागतिक बाजारपेठेनुसार बदलतात. मात्र, कुवेत आणि कझाकस्तानमध्ये सरकार स्वतः किंमत निश्चित करते. यामुळे तिथे बाजारातील अस्थिरतेचा फटका सामान्य जनतेला बसत नाही.
Converting those listed 1L prices to per gallon (×3.785): China: $3.97
USA: $4.43
Japan: $4.50
Australia: $4.92
Korea: $5.30
UK: $6.81
France: €7.00
Germany: €7.19
Singapore: $9.88
Hong Kong: $15.63 Japan still relatively cheap on the list. — Grok (@grok) May 4, 2026
credit – social media and Twitter
४. वाहतूक खर्चात बचत:
अनेक तेल उत्पादक देश आपल्या देशांतर्गत वापरासाठी पाईपलाईनचा वापर करतात. तसेच ते गरजेपेक्षा जास्त उत्पादन करत असल्याने, ते आपल्या देशातील किमती जाणीवपूर्वक कमी ठेवतात जेणेकरून अर्थव्यवस्थेला गती मिळेल.
५. कमी कर रचना:
युरोपीय देशांमध्ये इंधनावर ५० ते ६० टक्के कर लावला जातो, तर या स्वस्त गॅस असलेल्या देशांमध्ये कर नगण्य किंवा अत्यंत कमी असतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mayon Volcano: फिलीपिन्सचा सर्वात सक्रिय ज्वालामुखी पुन्हा जागृत; आकाशात राखेचे साम्राज्य अन् हजारो लोकांचे स्थलांतर, VIDEO VIRAL
दुसरीकडे, युनायटेड किंगडम (UK), स्वीडन आणि स्वित्झर्लंड यांसारख्या विकसित आणि श्रीमंत देशांमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ₹३,००० ते चक्क ₹६,००० पर्यंत असू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे तिथे असलेला ‘कार्बन टॅक्स’, अत्यल्प सरकारी मदत आणि पूर्णपणे जागतिक बाजारावर असलेले अवलंबित्व.
या जागतिक विषमतेमुळे हे स्पष्ट होते की, ज्या देशांकडे नैसर्गिक संसाधने आहेत आणि ज्यांची सरकारी धोरणे लोककल्याणकारी आहेत, तिथेच आजच्या युगात स्वस्त जगणे शक्य आहे. ऊर्जेच्या या खेळात भविष्यात भारतासारखे देश स्वतःचे उत्पादन वाढवून किंवा पर्यायी ऊर्जेचा वापर करून या देशांच्या रांगेत बसणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Ans: अल्जेरियामध्ये सर्वात स्वस्त एलपीजी मिळतो, जिथे दर प्रति लिटर साधारणपणे ७ ते ९ रुपये आहेत.
Ans: संबंधित देशांकडे असलेले स्वतःचे नैसर्गिक वायूचे साठे आणि सरकारने दिलेले मोठे अनुदान ही यामागील मुख्य कारणे आहेत.
Ans: तिथे करांचे प्रमाण जास्त आहे, सरकारी अनुदान मिळत नाही आणि ते देश इंधनासाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहेत.






