पुष्टी मार्गाचे संस्थापक ‘वल्लभाचार्य’ यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
पुष्टिमार्गाचे संस्थापक ‘वल्लभाचार्य’ यांची आज जयंती आहे. ते भक्ती चळवळीतील एक महत्त्वाचे संत असून त्यांचा जन्म १४७९ मध्ये झाला. त्यांनी श्रीकृष्णभक्तीवर आधारित ‘पुष्टिमार्ग’ या वैष्णव संप्रदायाची स्थापना केली. या मार्गात भक्तीला सर्वोच्च स्थान देण्यात आले असून, ईश्वराची कृपा (पुष्टि) मिळवून मोक्षप्राप्ती साध्य होते, असा विचार त्यांनी मांडला.
वल्लभाचार्यांनी ‘शुद्धाद्वैत’ या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला. त्यांच्या मते, जग आणि ब्रह्म यांच्यात भेद नसून सर्व काही परमेश्वराचेच स्वरूप आहे. त्यांनी भारतभर भ्रमण करून धर्मप्रसार केला आणि लोकांना साधी, सहज भक्ती करण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या शिकवणुकीत प्रेम, समर्पण आणि ईश्वराशी निस्सीम नाते यांना विशेष महत्त्व आहे. (Dinvishesh)
26 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
26 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
26 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष






