Donald Trump यांच्यावर वारंवार हल्ले का होतायात? अब्राहम लिंकनशी काय संबंध? राष्ट्राध्यक्षांनीच केला त्या जुन्या घटनेचा खुलासा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रम्प यांच्यावर शनिवारी (२५ एप्रिल) वॉशिंग्टन येथील हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस करोस्पोंडेंट्स डिनर पार्टी दरम्यान प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई करत हल्लेखोराला पकडले असून ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलवले.
या घटनेवर व्हाईट हाउस प्रेसरुममधून देशाला संबोधित करताना ट्रम्प यांनी खळबळजनक विधान केले. त्यांनी हल्ल्याची तुलना अब्राहम लिंकनशी केली. त्यांनी म्हटले की, जे नेते समाजात प्रभावशील बदल करण्याचा प्रयत्न करतात आणि धाडसी निर्णय घेतात, अशा नेत्यांनाच सतत लक्ष्य केले जाते.
ट्रम्प यांनी त्यांच्यावरील हल्ल्याबाबत बोलताना म्हटले की, मी राजकीय नेत्यांचा सखोल अभ्यास केला आहे. जे नेते सर्वाधिक प्रभावशाली असतात, त्यांच्यावरच हल्ले होतात. त्यांच्या मते अब्राहम लिंकन देखील एक प्रभावशाली होते. त्यांना अमेरिकेला गृहयुद्धातून बाहेर काढले होते. परंतु १४ एप्रिल १८५६ मध्ये त्यांची वॉशिंग्टनमध्ये हत्या करण्यात आली. शिवाय ही घटना देखील एप्रिलमध्येच घडली होती. ट्रम्प यांच्यावर देखील वॉशिंग्टन येथे आणि एप्रिल महिन्यातच हल्ला झाला आहे. यामुळे त्यांनी या घटनेचा संबंध अब्राहम लिंकनशी जोडला आहे.
दरम्यान ट्रम्प यांनी आपल्या भाषणात सुरक्षा यंत्रणेचेही कौतुक केले आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क नसती, तर पुन्हा एकदा अमेरिकेत ब्लॅक एप्रिल सारखी परिस्थिती निर्माण झाली असती.
Reporter: Why do you think this keeps happening to you?Trump: I have studied assassinations… they always go for the most impactful people, like Abraham Lincoln. They don’t go after the ones who don’t do much. We have done a lot. pic.twitter.com/RI7WZ2nV8v — Clash Report (@clashreport) April 26, 2026
Donald Trump यांच्या हत्येचा डाव पुन्हा हुकला; यापूर्वी यमसदनी पाठवण्याचे ‘हे’ मास्टरप्लॅन
Ans: अब्राहम लिंकन यांची १८५६ मध्ये वॉशिंग्टन एप्रिल महिन्यांतच हत्या करण्यात आली होती. ट्रम्प यांच्या मते, ज्या नेत्यांचा प्रभाव जास्त असतो, जे धाडसी निर्णय घेतात अशाच लोकांची हत्या केली जाते.
Ans: इतिहासात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची १८५६ मध्ये वॉशिंग्टन येथे हत्या करण्यात आली होती. यामुळे एप्रिल महिना शोकांतिकेचा काळ मानला जातो.. ट्रम्प यांनी याचा उल्लेख ब्लॅक एप्रिल म्हमून केला आहे,
Ans: ट्रम्प यांच्यावर वॉशिंग्टन येथील हॉटेल हिल्टन येथे डिनर पार्टीदरम्यान हल्ला झाला असून शनिवारी (२५ एप्रिल) ही घटना घडवली आहे.






