Iran Conflict : इराणवरुन अमेरिका-इस्रायलमध्ये फूट? ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयावर नेतन्याहू संतप्त, दोघांमध्ये फोनवरच जुंपली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) इराणवर पूर्ण ताकदीने लष्करी कारवाई करण्यावर ठाम आहेत. त्यांना इराणमधील लष्करी तळे, मुख्य पायाभूत सुविधा नष्ट करायच्या आहेत. मात्र, कतार, सौदी अरेबिया आणि यूएईच्या मध्यस्थीनंतर ट्रम्प यांनी कूटनीतीचा मार्ग अवलंबवण्याच निर्णय घेतला आहे.
यामुळे ट्रम्प यांनी सध्या इराणवरील हल्ला पुढे ढकलला आहे. ट्रम्प यांना युद्धामुळे कोणताही बळी गेलेला नको आहे. यामुळे त्यांनी शांततापूर्ण आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्यावर भर दिला आहे. परंतु नेतन्याहूंनी याला तीव्र विरोध केला आहे.
सध्या पाकिस्तान अमेरिका इाराणमध्ये मध्यस्थीची भूमिका निभावत आहे. इस्रायलच्या मते, ३० दिवसांचा शांतता प्रस्ताव तयार केला जात आहे. येत्या ३० दिवसांत इराणच्या अणु कार्यक्रम आणि होर्मुझ(Hormuz) वर चर्चा होणार आहे. मात्र इराणच्या हेतूंवर इस्रायलने अविश्वास व्यक्त केला आहे.
इस्रालच्या मते, चर्चेच्या बहाण्याने इराण (Iran) केवळ वेळकाढूपणा करत असून आपली लष्करी ताकद वाढवत आहे. यामुळे चर्चा न करतो थेट हल्ला करण्यावरच इस्रायलने भर दिला आहे. दुसरीकडे इराणने १४ कलमी प्रस्तावावर ठाम भूमिका घेतली आहे.
सध्या ट्रम्प शांतता चर्चेच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही, तर लष्करी कारवाई होऊ शकतो. मात्र, शांततेसाठी एक संधी देणे महत्त्वाचे आहे. सध्या दोन्ही नेत्यांमधील या वादाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यावरच मध्यपूर्वेचे भविष्य अवलंबून आहे. यामुळे ट्रम्प नेतन्याहूंच्या हट्टीपणापुढे झुकतात का शांतता प्रस्थापित करतात, यावर सर्वांचे लक्ष आहे.
Israel Gaza News : गाझा मदतकर्त्यांसोबत इस्रायलचे अमानुष कृत्य; जगभरातून तीव्र निषेध, VIDEO






