MBS चे वाळवंट असलेले नंदनवनच सौदीत विनाश घडवणार; 'सिंकहोल' बनणार, तज्ज्ञांचा मोठा इशारा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
रियाध : सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘निओम’ मोठ्या अडचणींमध्ये सापडला आहे. लाल समुद्राच्या किनाऱ्याजवळील वाळवंटात उभारण्यात येणाऱ्या या महाकाय आधुनिक शहरावर सध्या आर्थिक संकट आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सौदी अरेबियाला युनायटेड अरब एमिरेट्सच्या (UAE) दुबई शहरावर मात करायची आहे. त्यामुळे ‘निओम द लाइन’ नावाचे अत्याधुनिक शहर उभारण्याची योजना आखण्यात आली होती. या शहरावर तब्बल १ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते हा प्रकल्प सौदीसाठी ‘सिंकहोल’ ठरू शकतो.
MBS यांचा ‘व्हिजन 2030’ हा सौदी अर्थव्यवस्थेचे तेल उत्पादनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने आखण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून ‘निओम’ शहराची संकल्पना पुढे आली. यामध्ये पर्यटक, अब्जाधीश आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, हा प्रकल्प सौदी अरेबियासाठी आर्थिक संकट ठरू शकतो. १७० किमी लांबीच्या या शहराच्या उभारणीला सातत्याने विलंब होत आहे आणि खर्च अनपेक्षितरीत्या वाढत आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर ५० अब्ज डॉलर्स खर्च झाले असून अंतिम खर्च ८.८ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत जाऊ शकतो. ही रक्कम सौदीच्या वार्षिक बजेटच्या २५ पट मोठी आहे. त्यामुळे सौदी अरेबियाला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सीरियात रक्तरंजित तांडव; एक हजाराहून अधिक मृत्यू, महिलांची नग्न परेड आणि हिंसाचाराने हैराण देश
निओम प्रकल्पामुळे सौदी अरेबियाची परिस्थिती ऐतिहासिक ‘वॉटरलूच्या लढाई’प्रमाणे होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. नेपोलियन बोनापार्टप्रमाणे MBS यांनाही त्यांच्या योजनांची मोठी किंमत मोजावी लागू शकते. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर परदेशी कामगारांची आवश्यकता आहे. मात्र, अपुरे रस्ते, वीज पुरवठ्यातील अडचणी आणि तांत्रिक अडथळ्यांमुळे हे शहर वेळेत पूर्ण होणे कठीण वाटत आहे.
या प्रकल्पावर ‘मॅकिन्से अँड कंपनी’सारख्या आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपन्या काम करत आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, ही कंपनी दरवर्षी १३ कोटी डॉलर्स इतका प्रचंड नफा मिळवत आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने फारसे यश मिळत नसल्याने या कंपनीवर टीका होत आहे. याशिवाय, निओमच्या जागेवरील स्थानिक लोकांना हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून, काही जणांना तुरुंगात टाकल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे मानवाधिकार संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : उत्तर कोरियाचे अमेरिकेसमोर शक्तिप्रदर्शन; दक्षिण कोरियाच्या किनाऱ्यावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा
सुरुवातीला निओम शहर २०३० पर्यंत पूर्ण करण्याचा विचार होता. मात्र, वाढत्या अडचणींमुळे आता त्याची मुदत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापूर्वी निओमचे CEO नधमी अल नसर यांना हटवण्यात आले होते. तसेच, प्रकल्पाचा मूळ आराखडाही लहान