फोटो सौजन्य : सोशल मीडिया
वॉशिंग्टन : अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाची रणधुमाळी सुरु आहे. तेथील सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी केली आहे. त्यात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील यंदा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. असे असताना आता त्यांच्या गोल्फ क्लबबाहेर हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारानंतर घटनास्थळी AK-47 ही रायफल देखील सापडली आहे.
हेदेखील वाचा : यूएस अध्यक्षीय निवडणुकांमध्ये गांजाची एंट्री; ट्रम्प असो की हॅरिस का त्यांना लीगल करायचा आहे जाणून घ्या
फ्लोरिडामध्ये रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्फ क्लबजवळ रविवारी दुपारी गोळीबार झाला. या गोळीबाराची माहिती देताना त्यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी सांभाळणारे कम्युनिकेशन डायरेक्टर स्टीव्हन चेउंग म्हणाले की, ट्रम्प सुरक्षित आहेत. गोळीबार कोणी केला याची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. सीक्रेट सर्व्हिस आणि एफबीआयने या घटनेचा तपास सुरू केला आहे’.
एफबीआयने एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, ते हत्येच्या प्रयत्नाच्या पार्श्वभूमीवर तपास करत आहेत. यापूर्वी 13 जुलै रोजी पेनसिल्व्हेनियामध्ये निवडणूक रॅलीदरम्यानच ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या कानाला स्पर्श करून गोळी बाहेर आली होती.
हल्लेखोर होता अवघ्या 300-500 यार्ड दूर
या गोळीबाराने अमेरिकेच्या निवडणूक प्रचारात गालबोट लागले आहे. गोळीबार करणारा हल्लेखोर डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून 300-500 यार्ड दूर होता. तपास संस्थेने सांगितले की, ‘आमच्याकडे एक साक्षीदार असून, त्याने आमच्याकडे AK-47 घेऊन आला. या साक्षीदाराने बंदुकधारी हल्लेखोराला झुडपातून पळताना आणि काळ्या निसान वाहनात पळताना पाहिल्याचे सांगितले. त्याने वाहनाचा फोटोही काढल्याचे साक्षीदाराने सांगितले.
हे देखील वाचा : इलॉन मस्कची कार अंतराळात काय करत आहे? कारण ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का