पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात स्फोट (फोटो- ट्विटर)
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात भीषण स्फोट
12 नागरिक जखमी झाल्याचे माहिती
स्फोटानंतरची दृश्ये कॅमेऱ्यात कैद
Blast In Supreme Court: पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात एक भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या स्फोटामुळे सुप्रीम कोर्टाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात गॅस सिलेंडर फुटल्याने भीषण स्फोट झाला आहे. कॅंटीनमध्ये हा स्फोट झाला आहे. हा स्फोट झाला तेव्हा सुप्रीम कोर्टातील वातानुकूलित यंत्रणेची दुरुस्ती केली जात होती. स्फोटाची तीव्रता इतकी होती की भिंतींना देखील भेगा पडल्या. अचानक झालेल्या स्फोटामुळे आवारात उपस्थित असणारे न्यायाधीश, वकील आणि अन्य कर्मचारी सुरक्षित ठिकाणी गेल्याचे समजते आहे.
🚨 Breaking:
An explosion occurred in the basement canteen of Pakistan’s Supreme Court, causing the entire building to shake. Emergency services have reached the site, and security around the court has been tightened. Casualty details are awaited. pic.twitter.com/DTPSXMP2xG — Leopard Eye (@leoparrd_eye) November 4, 2025
समोर आलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टातील कोर्ट नंबर 6 ला जास्त नुकसान झाले आहे. कोर्टात सुनावणी सुरू होती. मात्र तेथे उपस्थित असणाऱ्या कोणालाही दुखापत झालेली नाही.
पाकिस्तानवर संकट कोसळण्याची शक्यता
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं मोठा निर्णय घेत सिंधू जल करार रद्द केला. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने घेतलेल्या निर्णयासंदर्भात अहवाल समोर आलाय. त्यात जर भारताने सिंधू नदीचे पाणी रोखून ठेवले तर पाकिस्तानची बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. ज्यामुळे पाकिस्तानला प्रचंड भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागू शकते. तसेच, पाकिस्तानच्या शेजारील देशांची पाणी साठवायची क्षमता कमी असून त्याचा परिणाम कृषी, वीजनिर्मिती या क्षेत्रावर होऊ शकतो.
पाकिस्तानची शेती ८० टक्के सिंधू नदीवर अवलंबून असल्याने सिंधू जल करार स्थगित करणं पाकिस्तानसाठी हा धक्का मोठा समजला जात आहे. सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या प्रवाहात भारताच्या निर्णयामुळे मोठी घट झाली असून, नद्यांमधील पाणीसाठा कमी होताना दिसत आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी ही धोक्याची घंटा आहे. इकोलॉजिकल थ्रेट रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये सद्यस्थितीला असलेले धरण केवळ ३० दिवस सिंधू नदीचा प्रवाह रोखू शकते. त्यामुळे भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानची गोची झाली दिसून येत आहे. पाकिस्तानची वाढती लोकसंख्या त्यातच भारतानं रोखलेलं सिंधू नदीचं पाणी यामुळे तिथल्या भागात पाण्याची मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. विशेषत: उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या काळात या ठिकाणची परिस्थिती अत्यंत भीषण असल्याची शक्यता या अहवालात नमूद करण्यात आली आहे.






