पाकिस्तानमध्ये आयईडीचा स्फोट (फोटो -istockphoto)
पाकिस्तानच्या पख्तूनख्वा प्रांतात भीषण स्फोट
एसएचओसह 6 पोलिस कर्मचारी जखमी
पोलिसांनी सुरू केला वेगाने तपास
Pakistan Blast: पाकिस्तान गेले काही दिवस अंतर्गत गोष्टींशी लढताना दिसून येत आहे. दुसऱ्या देशांना दहशतवादी कारवाया करून त्रास देणाऱ्या पाकिस्तानलाच अंतर्गत संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या एका भागात स्फोट झाला आहे. पख्तूनख्वा प्रांतात भीषण स्फोट झाला आहे. या घटनेचा तपास पोलिस वेगाने करत आहेत.
पाकिस्तानच्या पख्तूनख्वा प्रांतात भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये 6 पोलिस कर्मचारी आणि एक एसएचओ दर्जाचं अधिकारी जखमी झाले आहेत. हा स्फोट कसा आणि कोणी केला याबाबतचा तपास त्या ठिकाणच्या सुरक्षा यंत्रणा करत आहेत.टॅंक जिल्ह्यातील कोटवली भागपासून 25 किमी दूर हा स्फोट झाला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: तिसऱ्या महायुद्धाचा काउंटडाउन! अमेरिकेपासून भारतापर्यंत 10 देश युद्धाच्या उंबरठ्यावर; जनताजनार्दन सोसणार झळ
पाकिस्तानच्या पख्तूनख्वा प्रांतात या आधी देखील असे स्फोट झाले आहेत. आज झालेल्या आयईडी स्फोटचा देखील तपास केला जात आहे. मागील वर्षी या भागात क्रिकेटचा सामना सुरू असताना देखील एक ब्लास्ट झाला होता. यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले होते. दहशतवादी संघटना अशा प्रकारचे स्फोट घडवून आणून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. दहशतवादी कारवाया करून भारताला त्रास देणाऱ्या पाकिस्तानला आता अंतर्गत सुरक्षेत दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे.
पाकिस्तानात पुन्हा फुत्कारले दहशतवादाचे अजगर
पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि जागतिक दहशतवादी मौलाना मसूद अझहरने पुन्हा एकदा भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका ताज्या ऑडिओ क्लिपमध्ये, मसूद अझहरने दावा केला आहे की त्याच्याकडे भारतात घुसखोरी करण्यासाठी १,००० हून अधिक आत्मघाती हल्लेखोर तयार आहेत. मात्र, संरक्षण तज्ज्ञांच्या मते, ही धमकी नसून भारताने मे २०२५ मध्ये केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे निर्माण झालेली हतबलता आहे.
व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये मसूद अझहर अत्यंत चिथावणीखोर भाषेत बोलताना ऐकू येतो. तो म्हणतो, “आमच्याकडे फक्त शंभर-दोनशे नव्हे, तर हजारो फिदाईन (आत्मघाती हल्लेखोर) तयार आहेत. जर त्यांची खरी संख्या जगासमोर आली, तर खळबळ उडेल.” अझहरचा दावा आहे की हे तरुण कोणत्याही भौतिक लाभासाठी किंवा व्हिसासाठी नव्हे, तर केवळ ‘शहादत’ (हौतात्म्य) मिळवण्यासाठी तडपत आहेत. भारताच्या कोणत्याही मिसाईला किंवा लढाऊ विमानाला हे फिदाईन घाबरत नाहीत, अशी बढाईही त्याने यात मारली आहे.






