भारत आणि पाकिस्तानने 'गुप्त' चर्चा पुन्हा सुरू केली आहे का? तीन महिन्यांत माजी सेनापती आणि राजनयिकांच्या गुप्त बैठका ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
India Pakistan Secret Talks 2026 : भारत आणि पाकिस्तान ( India-Pakistan relation) यांच्यातील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या दोन्ही अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील अधिकृत संवाद जवळपास ठप्प झाला होता. केवळ दोन्ही देशांच्या लष्करी कारवायांच्या महासंचालकांमधील (DGMO) हॉटलाइन हेच संवादाचे एकमेव माध्यम उरले होते. मात्र, आता पडद्यामागे काहीतरी मोठे शिजत असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या तीन महिन्यांत दोन्ही देशांच्या माजी लष्करी नेत्यांच्या आणि निवृत्त राजनैतिक अधिकाऱ्यांच्या गुप्त बैठका झाल्याचे वृत्त समोर आले असून, यामुळे आंतरराष्ट्रीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
‘द इंडियन एक्सप्रेस’च्या एका विशेष अहवालानुसार, या बैठका एकदा कतारमध्ये आणि दुसऱ्यांदा आशियातील एका दुसऱ्या महत्त्वाच्या राजधानीत पार पडल्या. या बैठका जरी अधिकृतरीत्या ‘शासकीय चर्चा’ नसल्या, तरी ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांमधील हा अशा प्रकारचा पहिलाच मोठा संपर्क आहे. महत्त्वाचे म्हणजे, इस्लामाबाद आणि रावळपिंडी (पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय) या दोन्ही ठिकाणी भारतासोबत पुन्हा संवाद सुरू करण्याबाबत सकारात्मक वातावरण तयार होत असल्याचे समजते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Drug Cartels : ट्रम्पचा ‘किलर’ प्लॅन! पॅसिफिक महासागरात अमली पदार्थांच्या संशयित बोटीवर हल्ला; 2 जण ठार, एकाचा शोध सुरू
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकींमधील निष्कर्ष आणि पाकिस्तानची संवादासाठी असलेली ‘इच्छा’ याबद्दलची माहिती भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या कार्यालयाला आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाला कळवण्यात आली आहे. जरी भारताची जाहीर भूमिका “दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत” अशी असली, तरी भविष्यात एखादा मोठा दहशतवादी हल्ला झाल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी ‘बॅकपॅनल चॅनल’ डिप्लोमसी आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
भारताने हे स्पष्ट केले आहे की ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे संपलेले नाही, तर ते केवळ ‘स्थगित’ करण्यात आले आहे. दिल्लीने एक कठोर लक्ष्मणरेषा आखली आहे—जर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला, तर तो ‘युद्धाची कृती’ (Act of War) मानला जाईल आणि लष्करी कारवाया पुन्हा सुरू होतील. अशा परिस्थितीत, अचानक उद्भवणाऱ्या संकटाचे व्यवस्थापन करण्यासाठी नागरी आणि राजकीय स्तरावर एक यंत्रणा असणे गरजेचे आहे. जर संवादच नसेल, तर चुकीच्या माहितीमुळे अण्वस्त्र युद्धाचा धोका निर्माण होऊ शकतो, ही भीती दोन्ही बाजूंना सतावत आहे.
China Confirms On‑Ground Role In Supporting Pakistan During Operation Sindoor China has, for the first time, officially admitted that its personnel were present on Pakistani soil during Operation Sindoor, providing direct technical support to the Pakistan Air Force. This… pic.twitter.com/f5wFSu2X7j — Netram Defence Review (@NetramDefence) May 9, 2026
credit – social media and Twitter
पाकिस्तान सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांचे ट्रम्प प्रशासनाशी असलेले जवळचे संबंध भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात. साऊथ ब्लॉकमधील सूत्रांच्या मते, भारताने युद्धात जरी विजय मिळवला असला, तरी ‘कथानकाच्या लढाईत’ (Narrative Battle) पाकिस्तान सध्या आघाडीवर आहे. ट्रम्प यांच्या निकटवर्ती वर्तुळात पाकिस्तानने केलेली चलाख खेळी पाहता, भारताला जागतिक स्तरावर आपली बाजू मांडण्यासाठी आणि ट्रम्प यांच्या थेट हस्तक्षेपापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी इस्लामाबादशी गुप्त संवाद सुरू ठेवणे अनिवार्य वाटत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Space Mystery: पेंटागॉनचा ‘पँडोरा बॉक्स’! Aliens आणि UFO फाईल्समधील ‘त्या’ 161 कागदपत्रांनी जग हादरले; काय आहे चंद्रावरील रहस्य?
भारत आणि पाकिस्तानमध्ये गुप्त चर्चेचा मोठा इतिहास आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान, अजित डोवाल यांनी बँकॉक येथे तत्कालीन पाकिस्तानी NSA नासिर खान जंजुआ यांच्याशी अनेकदा गुप्त चर्चा केली होती. २०२१ मध्येही डोवाल यांनी तत्कालीन पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्याशी संवाद साधून नियंत्रण रेषेवर (LoC) शस्त्रसंधी घडवून आणली होती. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या ‘शांतता मोहिमेची’ तयारी सुरू असल्याचे दिसत आहे.






