भारताच्या स्वदेशी लढाऊ विमानांच्या उत्पादनाला वेग; अमेरिकेकडून जेव्हलिन, क्षेपणास्त्र आणि स्ट्रायकरही करणार खरेदी? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानांच्या उत्पादनाला वेग मिळाला आहे. अमेरिकेने तेजस Mk1A लढाऊ विमानांसाठी लागणाऱ्या GE F404-IN20 इंजनची डिलिव्हरी सुरु केली आहे. 2021 मध्ये भारताने अमेरिकन कंपनी जनरल इलेक्टिकसोबत 716 डॉलर्सचा करार केला होता. या अंतर्गत 99 इंजिन्सची खरेदी सुनिश्चित करण्यात आली होती. परंतु सप्लाय चेनमध्ये काही अडथळ्यांमुळे डिलिव्हरीला विलंब झाला होता. याशिवाय भारत अमेरिकेडून जेव्हलिन क्षेपणास्त्र आणि स्ट्रायकरही खरेदी करणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण कोरियाकडून काही कॉम्पोनंट्सचा पुरवाठ थांबला होता, यामुळे डिलिव्हरीसाठी अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान आता या इंजिनच्या डिलिव्हरीला सुरुवात झाली असून 2026 पर्यंत दर महिन्याला दोन लोकोमोटिव्ह डिलिव्हर होणार आहेत, अशी माहिती भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार यांनी दिली. एप्रिलमध्ये याचे पहिले इंजिन भारताला मिळेल आणि दुसरे इंजिन जुलैमध्ये मिळण्याची अपेक्षा आहे.
भारताच्या हवाई दलात तेजस Mk1A आणि Mk2 प्रकाराचे 352 लढाऊ विमान सामाविष्ट होणार आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या विमानांचे उत्पादन करत आहे. 2026-27 पर्यंत दरवर्षी 30 युनिट्सचे उत्पादन केले जाणार आहे. HAL कडून उत्पादनात झालेल्या विलंबासाठी टीका करण्याच येत होती, परंतु आता या स्वदेशी विमानांच्या उत्पादनाला गती मिळाली आहे.
तसेच भारत अमेरिकेकडून जेव्हलिन अँटी-टँक गाईडेड मिसाईल (ATGM)च्या खरेदीची देखील तयारी करत आहे. ‘फायर अँड फॉरगेट’साठी ओळखल्या जाणाऱ्या या मिसाईची क्षमता शत्रूंचे टॅंकर्सवर कमजोर भागांवर हल्ला करते. या क्षेपणास्त्राचा मारा २.५ किलोमीटरपर्यंत करतो येतो. हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक लढाईसाठी अत्यंत उपयुक्त आहे. सध्या भारताकडे दुसऱ्या पिढीचे ATGM क्षेपणास्त्र आहेत. पण 68 हजार पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे आणि 850 लॉंटर्सची कमतरता आहे.
याशिवाय भारताने अमेरिकेच्या स्ट्रायकर आर्मरड व्हेईकलेच्या खरेदीसाठी त्याचे परिक्षण केले आहे. परंतु सध्या व्हेरिएंट च्या खरेदीची शक्यता कमी आहे. लष्कर एका Amphibious म्हणजेच पाण्यात आणि जमिनीवर चालणाऱ्या व्हेरिएंटची मागणी करत आहे. स्ट्रायकरमध्ये 30 mm तोफ, मशीन गन आणि AGTM तैनात करण्याची जागा आहे. यामध्ये NBC संरक्षण प्रणाली असून हे वाहन नेटवर्क सेंट्रिक युद्धासाठी तयार करण्यात आले आहे. भविष्यात भारताच्या Future Infantry Combat Vehicle योजनेचा स्ट्रायकर भाग बनू शकते.