पाकिस्तानमध्ये तयार होणार महिला दहशतवादी (फोटो- सोशल मीडिया)
भारताने पाकिस्तानमध्ये घुसून मारलेले दहशतवादी
मसुद अजहर तयार करणार महिला दहशतवादी
मसुद अजहरची बहीण करणार या तुकडीचे नेतृत्व
पाकिस्तान हा दशतवाड्यांचा अड्डा असल्ला देश आहे. पाकिस्तान अनेकदा भारताच्या कुरापती काढत असतो. पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी संघटना भारतात हल्ले करण्यासाठी योजना आखत असतात. दरम्यान भारताने गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानच्या या दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. नुकतेच भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवले. मात्र आताजैश ए मोहम्मद दहशतवादी संघटना महिला दहशतवादी तयार करणार आहेत.
पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेने आता आपल्या रणनीतीमध्ये बदल केला आहे. या संघटननेने पहिल्यांदाच एक महिला तुकडी तयार केली आहे. ज्याचे नाव ‘जमात उल मोमीनात’ असे ठेवण्यात आले आहे. या तुकडीची घोषणा मसुद अजहरच्या नावे एक पत्र जारी केले आहे. ऑक्टोबर महिन्यापासून या तुकडीसाठी भरती सुरू करण्यात आली आहे.
‘जमात उल मोमीनात’ हे पूर्णपणे महिलांवर आधारित आहे. यामध्ये महिलांची तुकडी सुरू करण्यात आली आहे. या तुकडीचे नेतृत्व सादिया अजहर करत आहे. सादिया अजहर मसुद अजहरची बहीण आहे. सादियाच्या नवऱ्याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईत ठार मारले होते.
आर्थिक दृष्ट्या अक्षम असणाऱ्या महिलांना या तुकडीत घेतले जाणार आहे. याचे केंद्र बहावलपुर, कराची, कोटली, हरिपूर या ठिकाणी असणार आहे. जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटना या महिलांना या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहे. त्यानंतर त्यांना विविध ऑपरेशन्ससाठी पाठवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटना महिला बॉम्ब म्हणजेच महिला दहशतवादी तयार करत असल्याचे दिसून आले आहे.
लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान भारतीय लष्कराने घातले. त्यातच आता भारतीय लष्कराच्या प्रमुखांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. भारताचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी भारत पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले. ते राजस्थानच्या घडसाना येथे बोलत होते.
भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
भारताचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी जवानांना सतर्क आणि कोणत्याही कारवाईसाठी तयार राहण्याच्या सूचना केली. भारत पूर्णपणे तयार आहे. यावेळी आम्ही ऑपरेशन सिंदूर 1.0 प्रमाणे संयम राखणार नाही. पाकिस्तानला आपले भौगोलिक अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर त्यांना दहशतवाद थांबवावा लागेल. जवानांनी तयार राहिले पाहिजे. ईश्वराची इच्छा असल्यास तुम्हाला लवकरच संधी मिळेल. असे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी मे महिन्यात हवाई दल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरबद्दल महत्त्वपूर्ण खुलासे केले. या पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताने चार ते पाच एफ-१६ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली. भारतीय हवाई दल प्रमुखांनी सांगितले की, या कारवाईदरम्यान भारताने सुमारे १२ पाकिस्तानी विमाने पाडली, ज्यात ९ ते १० लढाऊ विमाने समाविष्ट आहेत. त्यांनी पाकिस्तानची खिल्ली उडवत म्हटले की, ते भारतीय विमानांबद्दल पसरवत असलेल्या “प्रेमकथा” चालू ठेवल्या पाहिजेत.