फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: सध्या सर्व जगाचे लक्ष अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीवर लागले आहे. थोड्याच वेळात या निवडणुका पार पडतील. या निवडणुकीत रिपल्बिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात लढत पाहायला मिळाली. दरम्यान अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्ष आणि उमेदवार कमला हॅरिस यांनी यूएस निवडणूक 2024 मध्ये मतदानाच्या एक दिवस आधी आपल्या विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
निवडणुकीत गती त्यांच्या बाजूने आहे- कमला हॅरिस
पेनसिल्व्हेनियाच्या एलेनटाउनमध्ये आयोजित निवडणूक रॅलीदरम्यान, हॅरिस यांनी म्हटले की या निवडणुकीत गती त्यांच्या बाजूने असल्याचे म्हटले आहे. रॅलीला संबोधित करताना हॅरिस यांनी अमेरिकेच्या अफोर्डेबल केअर कायद्याचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या “आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आम्ही परत जाणार नाही,” याशिवाय त्यांनी सांगितले की, काही लोक अजूनही या कायद्यापासून मुक्त होऊ इच्छितात, परंतु ते यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाहीत. “आम्ही त्या दिवसांकडे परत जाणार नाही, जेव्हा विमा कंपन्या आजारी लोकांना विमा देण्यास नकार देत,” असे कमला हॅरिसने स्पष्ट केले.
Took some time today to hear from voters in Pennsylvania and ask for their support.
There’s still time to join us on the doors: https://t.co/ZaRpcqNdUT pic.twitter.com/J7E8ObhEjp
— Kamala Harris (@KamalaHarris) November 5, 2024
तसेच, कमला हॅरिसने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कमला हॅरिस पेनसिल्व्हेनियामधील स्थानिक मतदारांच्या दारात जाऊन समर्थनासाठी आवाहन करताना दिसत आहे. हॅरिस यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “आज पेनसिल्व्हेनियामधील मतदारांशी बोलण्यात आणि त्यांचा पाठिंबा मागण्यासाठी थोडा वेळ घालवला.” या उपक्रमांद्वारे हॅरिस निवडणुकीच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी लक्ष केंद्रित करत आहेत. यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता वाढते.
एकजुटीचा संदेश आणि मतदानाच्या महत्वावर जोर
कमला हॅरिस यांनी या रॅलीत उपस्थित लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. “पेनसिल्व्हेनियामधील प्रत्येकाने मतदान केले पाहिजे कारण या निवडणुकीत त्यांच्या मताने फरक पडणार आहे,” असे त्यांनी सांगितले. हॅरिस यांचा आत्मविश्वास आणि उत्साह त्यांच्या पक्षातील सक्रियतेवर आधारित होता. कमला हॅरिस यांनी आपल्या भाषणात मतदानाचा महत्व अधोरेखित केले आणि मतदारांना भविष्यातील नेतृत्वासाठी तयार होण्यास सांगितले. कमला हॅरिसने एकजुटीचा संदेश दिला आणि मतदानाच्या महत्वावर जोर दिला, कारण प्रत्येक मत महत्त्वाचे आहे आणि या निवडणुकीत प्रत्येकाचा आवाज महत्वाचा आहे.