पतीने केले पत्नीचे 200 तुकडे; ते फेकण्यासाठी मित्राला दिले 5 हजार

एका 28 वर्षीय व्यक्तीने त्याच्या पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली. यानंतर तिच्या शरीराचे 200 हून अधिक तुकडे केले. इतकेच नाहीतर हे तुकडे आठवडाभर किचनमध्येच ठेवले होते. त्यानंतर मित्राच्या मदतीने हे तुकडे नदीत फेकून दिले.

    लंडन : एका 28 वर्षीय व्यक्तीने त्याच्या पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली. यानंतर तिच्या शरीराचे 200 हून अधिक तुकडे केले. इतकेच नाहीतर हे तुकडे आठवडाभर किचनमध्येच ठेवले होते. त्यानंतर मित्राच्या मदतीने हे तुकडे नदीत फेकून दिले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मित्राला 5 हजार रुपये दिल्याचा धक्कादायक प्रकार लंडनमध्ये घडला.

    लंडनच्या निकोलस मेटसनने 26 वर्षीय पत्नी होली ग्रॅमलीच्या हत्येची कबुली दिली. तपासादरम्यान सुरुवातीला त्याने आपण हत्या केली नसल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर कबुली दिली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मित्राला 5 हजार रुपये दिले होते. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका व्यक्तीला विथम नदीत प्लास्टिकच्या पिशव्या तरंगताना दिसल्या. एका पिशवीत मानवी हात आणि दुसऱ्यामध्ये ग्रॅमलीचे मुंडके असल्याचे दिसले होते.

    यात मृतदेहाचे एक-दोन नाहीतर तब्बल 224 तुकडे सापडले. या प्रकारानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तिच्या पतीची चौकशी केली असता संपूर्ण प्रकार समोर आला. याबाबत गॅमलीच्या आईने कोर्टात सांगितले की, तिच्या मुलीचे लग्न होऊन फक्त 16 महिने झाले होते. लग्नानंतर निकोलस गॅमलीला त्रास देत होता. तिच्या कुटुंबियांना अनेक वर्षांपासून भेटू दिले नाही. दोघेही विभक्त होण्याच्या मार्गावर होते, पण त्याने माझ्या मुलीची हत्या केली.