‘NO MORE MR. NICE GUY' , ट्रम्प यांचा इराणला अंतिम इशारा; हातात रायफल घेतलेला आक्रमक फोटो शेअर करत दिली धमकी (फोटो सौजन्य: ट्रुथ सोशल/@realDonaldTrump)
Explainer : इराणशी युद्धात अमेरिकेची Exit रणनीती! विजयाची घोषणा करुन युद्धाचे मैदान सोडणार ट्रम्प?
‘NO MORE MR. NICE GUY’
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प हातात असॉल्ट रायफल घेऊन उभे आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘NO MORE MR. NICE GUY’ असे त्यांनी लिहिले आहे. अण्वस्त्र कराराच्या मुद्द्यावरुन इराण वेळकाढूपणा करत आहे. यामुळे ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी इराणला शहाणपणा शिकवण्याची वेळ आली आहे अशा शब्दा फटकारले आहे.
दरम्यान इराणने दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेला दोन अटींचा नवा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला ट्रम्प यांनी मात्र केराची टोपली दाखवली आहे. कारण या अटींमध्ये इराणने अण्वस्त्र कार्यक्रमावर चर्चेच नकार दिला होता. यामुळे ट्रम्प यांनी संतापून थेट मोठ्या लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे.
एकीकडे इराण आपल्या अटींवर ठाम भूमिका घेऊन आहे, तर दुसरीकडे ट्रम्पही इराण अमेरिकेच्या अटी मान्य करत नाहीत, अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे बंद करत नाहीत तोपर्यंत कोणताही करार होणार नाही असे म्हटले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही देशांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. १३ एप्रिल पासून अमेरिकेने इराणी जहाजांची नाकेबंदी सुरु केली आहे, तर इराणने होर्मुझचा मार्ग रोखून धरला आहे. ज्यामुळे जागतिक स्तरावर मोठे इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. आता ट्रम्प यांच्या या नव्या अवतारामुळे आखाती देशांमध्ये संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर आता इराण काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण यावर मध्यपूर्वेच भवितव्य अवलंबून आहे.






