अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर होताच सुषमा अंधारेची पोस्ट व्हायरल (Photo Credit- X)
विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनीच पुन्हा एकदा परिषदेत जावे, असा आग्रह धरला होता. मात्र, आगामी विधानसभा निवडणुका आणि पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतःऐवजी अनुभवी नेते अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. दानवे हे उद्या (३० एप्रिल) सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
या निवडणुकीसाठी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे नावही चर्चेत होते. मात्र, अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अंधारे यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरेंना राखी बांधतानाचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले, “आमदारकी, खासदारकी आपल्यावरून १०० वेळा कुर्बान.” या पोस्टद्वारे त्यांनी पक्षप्रमुखांच्या निर्णयाचा आदर करत निष्ठेचा संदेश दिला आहे.
आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुरबान…🥰 pic.twitter.com/4vU5VW2wyi — SushmaTai Andhare (@andharesushama) April 29, 2026
दरम्यान, भाजपने विधान परिषदेसाठी ६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजप संसदीय समितीच्या मंजुरीनंतर, भाजपने महाराष्ट्रातील ५ विधान परिषदांच्या जागांसाठी पाच उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे, विधान परिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी एकूण ६ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
भाजप उमेदवार
सुनील कर्जतकर,
माधवी नाईक,
संजय भेंडे,
विवेक कोल्हे,
प्रमोद जठार,
प्रज्ञा सावंत
निवडणूक अधिसूचना जारी करण्याची तारीख: २३ एप्रिल २०२६
उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस: ३० एप्रिल २०२६
उमेदवार छाननी: २ मे २०२६
उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: ४ मे २०२६
मतदानाची तारीख: १२ मे २०२६
मतदानाची वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ४.
मतमोजणी: १२ मे २०२६ सायंकाळी ५ वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: १३ मे २०२६
Sambhaji Nagar 2026: संभाजीनगरमध्ये ‘व्हीप’ वॉर! अंबादास दानवेंवर स्वपक्षीय आमदाराचे गंभीर आरोप






