US Iran War : इराणशी युद्धात अमेरिकेची Exit रणनीती! विजयाची घोषणा करुन युद्धाचे मैदान सोडणार ट्रम्प? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) इराणसोबत कोणत्याही प्रकारची औपचारिक चर्चा न करता विजयाची घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर संस्था CIA कडून एक इनपुट मागवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासूनच्या संघर्षात अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे.
शिवाय हे युद्ध एक राजकीय ओझे वाटू लागले आहे. यामुळे यातून अमेरिका लवकरच बाहेर पडण्याचे संकेत व्हाईट हाउसकडून मिळाले आहे. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प शांतता चर्चेला कंटाळले असून, या विजयात अमेरिकेचाच विजय झाल्याच्या संभ्रमाच आहेत. अमेरिकेचे उद्दिष्ठ साध्य झाले असे सांगून यातून माघार घेण्याचा ट्रम्प यांचा विचाक सुरु आहे.
ट्रम्प यांच्या अशा वागण्यामागे प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.






