India Russia Ties: 'मी किंवा पंतप्रधान मोदी...' पुतिन यांनी ट्रम्पना दिला थेट संदेश; भारत-रशिया संबंधांवर निर्णायक विधान ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ धोरणांवर प्रतिक्रिया विचारली असता, पुतिन यांनी अत्यंत संयत भाष्य केले. त्यांनी सांगितले की, प्रत्येक देशाचा स्वतःचा आर्थिक अजेंडा असतो आणि अमेरिकेने घेतलेले निर्णय त्यांच्या सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली असतात. मात्र, रशिया अशा प्रकारच्या व्यापारी दबावाच्या धोरणांवर विश्वास ठेवत नाही. आमची अर्थव्यवस्था खुली आहे आणि आम्ही जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे पालन करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Modi Putin Meet: राजनैतिक चौकटीपलीकडील संवाद! PM मोदींनी प्रोटोकॉल तोडून केले मित्राचे स्वागत; ‘Limousine Diplomacy’ पुन्हा चर्चेत
“मेक इन इंडिया, मेक विथ रशिया” या संकल्पनेबद्दल बोलताना पुतिन म्हणाले की, बाह्य दबाव असला तरी मी किंवा पंतप्रधान मोदी कधीही कोणत्याही देशाविरोधात एकत्र येण्याचा विचार करणार नाही. आमचे सहकार्य कोणाला लक्ष्य करून नाही, तर स्वतःच्या देशाच्या हितासाठी आहे. ट्रम्प यांचा स्वतःचा राजकीय आणि आर्थिक अजेंडा आहे, आणि आमचा स्वतःचा. आम्ही कोणाचेही नुकसान करत नाही, तर सहकार्याची भूमिका घेतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
Neither me nor Prime Minister Modi have EVER collaborated to work AGAINST anyone, ‘despite external pressure’ — Putin ‘In our dealings we cause no harm to others, and I believe leaders from other countries should appreciate this’ https://t.co/Wt4JTC3Rw0 pic.twitter.com/a0YW1G2jq7 — RT (@RT_com) December 4, 2025
credit : social media and Twitter
रशियाकडून तेल खरेदी करून भारत “युद्धाला निधी देत आहे” या आरोपांवर उत्तर देताना पुतिनांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. कोणत्याही मित्र राष्ट्रांविषयी असे विधान करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे ते म्हणाले. तसेच एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सांगितले की, अमेरिका स्वतःही रशियाकडून अणुइंधन खरेदी करते. अमेरिकेतील अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये आजही रशियातून येणारे युरेनियम वापरले जाते. मग जर अमेरिकेला तो अधिकार आहे, तर भारताला तोच अधिकार का नसावा, असा सवाल पुतिन यांनी उपस्थित केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update : बलुचिस्तान की खैबर पख्तूनख्वा…कोण आधी मुक्त होणार? पाकिस्तानवरून मोठी बातमी; मुनीरचे कंबरडे मोडणार
भारत आणि रशियामधील ऊर्जा सहकार्य, संरक्षण, व्यावसायिक करार आणि तंत्रज्ञानातील भागीदारी येत्या काळात अधिक गहिरी होणार असल्याचे संकेतही या वक्तव्यातून मिळतात. ही भागीदारी कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता केवळ दीर्घकालीन धोरणात्मक हितसंबंधांवर आधारित असेल, हेच पुतिन यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. जागतिक राजकारणाच्या या गुंतागुंतीच्या समीकरणात भारताचा स्वतंत्र आणि स्वायत्त निर्णय घेण्याचा अधिकार रशियाने स्पष्टपणे मान्य केल्यामुळे, भारताच्या परराष्ट्र धोरणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी बळ मिळाले आहे. आजच्या बदलत्या जागतिक राजकारणात, “कोणाविरोधात नाही, तर स्वतःच्या प्रगतीसाठी” हा पुतिन यांचा संदेश विशेष महत्त्वाचा ठरत आहे, आणि भारत–रशिया संबंधांचा नवा अध्याय सुरू होत असल्याचे स्पष्ट चित्र पुढे येत आहे.
Ans: भारत–रशिया सहकार्य कोणत्याही देशाच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले.
Ans: अमेरिका स्वतः रशियाकडून अणुइंधन खरेदी करते, हे त्यांनी सांगितले.
Ans: विकास, ऊर्जा आणि राष्ट्रीय हितांचे संरक्षण हेच प्रमुख ध्येय आहे.






