नवी दिल्ली: आज चीनच्या DeepSeek या AI स्टार्टअपने नवीन AI मॉडेल लाँच करून जगभरात खळबळ उडवली आहे. आज या मॉडेलने कमी खर्चात उच्च दर्जाचा परफॉर्मन्स देत अमेरिकेतील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना अडचणीत आणले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्री-मार्केटिंग ट्रेडिंगदरम्यान NVDIA कॉर्पोरेशनचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. Deepseek-V3 नावाने लाँच केलेले हे चीनेच मॉडेल OpenAI आणि Meta सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यास सक्षम असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
अमेरिका आणि NVIDIA ला जोरदार झटका
चीनचे Deepseek AI मॉडेल लाँच झाल्यानंतर NVIDIA कंपनीच्या शेअर्समध्ये 17%ने घसरण झाली. या घटनेमुळे NVIDIA च्या मार्केट कॅपमध्ये 590 बिलियन डॉलर्सची मोठी घट झाली आहे. अमेरिकेतील तंत्रज्ञान बाजारावर या घटनेचा खोलवर परिणाम झाला असून NASDAQ इंडेक्समध्येही घसरण पाहायला मिळाली आहे. यामुळे केवळ NVIDIA नव्हे तर टेक-हेवी नॅस्डॅक कंपोझिट इंडेक्स देखील 0.50 टक्क्यांनी घसरला आहे.
कमी खर्च आणि अधिक कार्यक्षमता
हे नवीन Deepseek AI मॉडेल अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे मॉडेल अगदी कमी खर्चात अधिक कार्यक्षम आहे. हे मॉडेल ओपन-सोर्स आहे, म्हणजेच जगभरातील डेव्हलपर्स याचा वापर करून आपल्याला हवे तसे सुधार करू शकतात. NVIDIA सारख्या कंपन्यांच्या महागड्या चिप्स आणि प्रचंड ऊर्जा खपत करणाऱ्या मॉडेल्सच्या तुलनेत डीपसीकने कमी संसाधनांसह उत्कृष्ट परिणाम दिले आहेत. सध्या Deepseek मेटा प्लॅटफॉर्म आणि OpenAI च्या मालकीचे आहे. हे मॉडेल काही तासांतच ॲपलच्या स्टोअर स्टोअर रॅंकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचले आहे.
अमेरिकेच्या निर्बंधांना उत्तर
आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेने चीनवर हायटेक सेमीकंडक्टर तंत्रज्ञानावर निर्बंध घातले असतानाही DeepSeek ने मर्यादित संसाधनांचा वापर करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. या मॉडेलमुळे चीनच्या AI उद्योगाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. यामुळे चीन या प्रभावी तंत्रज्ञानाद्वारे बाजारपेठांमध्ये आपली पकड मजबूत करण्याच्या मार्ग लागले आहे.
अमेरिकेच्या स्टारगेट प्रोजेक्टवर परिणाम?
अमेरिकेत 100 बिलियन डॉलर खर्चून सुरू होणाऱ्या स्टारगेट प्रोजेक्टसाठी DeepSeek मोठा अडथळा ठरू शकतो असे भिती व्यक्त केली जात आहे. कमी खर्चात अधिक कार्यक्षम AI मॉडेल्समुळे अमेरिकेच्या तंत्रज्ञान कंपन्यांना आपल्या व्यापार धोरणांमध्ये बदल करावा लागणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
DeepSeek AI भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा
DeepSeek ने लाँच केलेले AI मॉडेल चीनच्या तंत्रज्ञान क्षमतेला सिद्ध करणारे आहे. हे मॉडेल जागतिक स्तरावर AI क्षेत्राला नवीन दिशा देऊ शकते. ओपन-सोर्स तंत्रज्ञानामुळे हे मॉडेल जागतिक स्तरावर लोकप्रिय झाले असून, भविष्यात यामुळे तंत्रज्ञान उद्योगात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.