Nuclear Pact : अमेरिकेची झोप उडाली! रशियाच्या 'या' मित्र देशाला मिळणार १० अणुबॉम्ब; युरोपच्या उंबरठ्यावर तैनात होणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे देखील वाचा : US Iran Conflict : जगाच्या नकाशावरुन गायब होणार इराण? ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टने हादरलं जग; आखातात युद्धाचे ढग गडद
मिळालेल्या माहितीनुसार, बेलारुसमध्ये १० अणुबॉम्ब तैनात केले जाणार असून यासाठी आपल्या सैनिकांना प्रक्षिण देण्याचे कामही बेलारुसने सुरु केले आहे. बेलारुसच्या संरक्षण मंत्रालायने या मोहिमेला दुजोरा दिला आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियन शास्त्रज्ञ आणि लष्करी तज्ज्ञ बेलारुस (Belarus) सैनिकांना या अण्वस्त्र वापरण्याचे प्रशिक्षण देत आहेत.
हे प्रशिक्षण संपल्यानंतर बेलारुसकडे १० अणुबॉम्ब सुपूर्द केली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही अण्वस्त्रे बेलारुसमध्ये तैनात असली तर याचे रिमोट कंट्रोल मात्र रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्याकडे राहणार आहे.
रशियाकडे सध्या जगातील ५००० पेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत. यामध्ये RS-29 Sarmat आणि यार्स यांसारख्या अतिविनाशकारी आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. बेलारुसची सीमा थेट युक्रेन (Ukraine) आणि तीन नाटो देशांना जोडून आहे. यामुळे बेलारुसमध्ये ही तैनाती पुतिन यांचा युरोपीय देशांवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एकीकडे अमेरिका (America) इराणला अण्वस्त्रे मिळण्यापासून रोखत आहे, तर दुसरीकडे पुतिन यांनी अमेरिकेच्या नाकाखालून अणूगेम सुरु केला आहे. रशियाच्या या पावलामुळे जागतिक सुरक्षेच्या समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. बेलारुसमध्ये अण्वस्त्रांच्या तैनातीमुळे युक्रेन युद्धाचा भडका आणखी उडू शकतो अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे नाटो देश आणि युक्रेनमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे देखील वाचा : Russia Ukraine युद्धाचा भडका! मॉस्कोवर युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू






