Pak-Baloch Conflict : बलुचिस्तान पुन्हा पेटलं! BLA ने पाकिस्तानी सैन्याच्या बसला स्फोटकांनी उडवलं; ४५ जवान ठार झाल्याचा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे देखील वाचा : US-Iran War : अमेरिका-इराण युद्ध भडकलं! बाल रुग्णालयावर बॉम्बहल्ल्याचा तेहरानचा मोठा दावा
BLA ने जारी केल्ल्या निवेदनानुसार, संघटनेच्या फतेह स्क्वाडने हा हल्ला केला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या बसला शक्तिशाली स्फोटांनी उडवून देण्यात आले. तसेच घटनास्थळावरील अतिरिक्त पाक सुरक्षा दलांवरही हल्ला करण्यात आल्याचा दावा केला. या गोळीबारात अनेक सैनिक जखमी झाले असून मृतांची संख्या वाढू शकते असे BLA ने म्हटले.
बलुचिस्तानमध्ये सरकारविरोधात लोकांनी बंड पुकारला आहे. बलुच फुटीरतावादी गटांनी सरकारवर बलुचिस्तानमधील नैसर्गिक व खनिज साधनंपत्तीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. याचा स्थानिकांना कोणताही लाभ मिळत नसल्याचे बलुच लिबरेशन आर्मीने म्हटले. यामुळेच बलुचिस्तानमधील संघटना पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची मागणी करत आहे. दुसरीकडे पाकिस्तान सरकारने BLA ला दहशवादी संघटना मानले आहे.
दुसरीकडे पाकिस्तानच्या ताब्यातील PoK मध्येही सरकारविरोधी आंदोलन सुरु आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय प्रतिनिधित्व, निवडणुकांमधील राखीव जागा, महागाई, अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा, सरकारच्या धोरणांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र रोष वाढत आहे. पीओकेच्या स्वातंत्र्याचीही मागणी केली जात आहे.
अशा परिस्थितीत बलुचिस्तानमधील हल्ल्यांमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्करासमोर मोठे आव्हान उभे आहे. परंतु अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. नुकत्याच झालेल्या हल्ल्याबाबतही पाकिस्तान सरकारन मौन असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक प्रश्न आणि बलुचिस्तानमधील हल्ले जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहेत. पाक सरकारच्या मौनावर प्रश्न उपस्थिक केले जात आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष्य पाकिस्तानकडे लागले आहे.
हे देखील वाचा : Canada Wildfire : कॅनडात वणव्याचा भीषण कहर! आगीच्या विळख्यात ट्रेन सापडली अन्…, थरारक दृश्यांचे VIDEO समोर






