Pak-Afghan War : पाकिस्तान-अफगाण संघर्षाचा पुन्हा भडका; सीमेवर भीषण गोळीबार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या या गोळीबारामुळे कोणाच्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. मात्र या चकामकीमुळे दोन्ही देशांत युद्ध सुरु होऊ शकते अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर सुरुवातील गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. चमन सीमेदवळी पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानमधून झालेल्या गोळीबाराचे प्रत्युत्तर म्हणून हल्ला केला असल्याचे म्हटले आहे. सध्या या गोळीबारामुळे प्रमुख वाहतूक मार्ग बंद झाला आहे. दुसरीकडे तालिबानने या गोळीबारासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे.
अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने म्हटले आहे की, पाकिस्तानी सैन्यांने कंधारच्या स्पिन बोल्दाक जिल्ह्यात पुन्हा एकदा अफगाणिस्तान सैन्यावर हल्ला केल्या. यामुळे त्यांना प्रत्युत्तर देण्यास अफगाणिस्तानला भाग पडले. पाकिस्तान सैन्यांने स्पिन बोल्दाक सीमा भागात हॅंडग्रेनेड फेकला होता, याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्या सैन्याने गोळीबार केला असल्याचे म्हटले आहे. तसेच अफगाणिस्तान युद्धबंदीसाठी तयार असून पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या कारणाने यामध्ये अडथळा निर्माण करत असल्याचे तालिबानने म्हटले आहे. तर पाकिस्तानने अफगाणिस्तानवर, कोणत्याही चिथावणीशिवाय चमन सीमेवर गोळीबार केला असल्याचे म्हटले आहे. सरकारने सैन्याला अलर्ट राहण्याचे आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये गेल्या ऑक्टोबरपासून सुरु झालेला संघर्ष थांबवण्यासाठी सतत शांतता चर्चा होत आहेत. मात्र या सर्व चर्चा एकामागून एक निष्फळ होत आहे. नुकतेच सौदीच्या रियाधमध्ये देखील अनाधिकृत चर्चा झाली होती, मात्र ही चर्चा अयशस्वी ठरली आहे. यापूर्वी देखील तुर्कीच्या मध्यस्थीने दोन्ही देशांत युद्धबंदी लागू करण्यात आली होती. परंतु युद्धबंदीच्या काही तासांतच पाकिस्तानने उल्लंघन करत अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. यामुळे दोन्ही देशांतील तणाव पुन्हा वाढला.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमा संघर्षाची ही पहिलीच वेळी नाही. पूर्वी इस्लामिक भांवडे म्हटली जाणारे देश आज एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. पाकिस्तान अफगाणिस्तानवर पाकिस्तानी तालिबानच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गटांना त्यांच्या भूभागावर आश्रय देत असल्याचा आरोप करतो. तर दुसरीकडे अफगाणिस्तान पाकिस्तानवर खोटा इस्लामाच्या प्रचाराचा आरोप करतो. शिवाय २०११ मध्ये अमेरिकेसोबत झालेल्या संघर्षात पाकिस्तानने अफगाणिस्ताना पाठ दाखवली होती. तेव्हापासून दोन्ही देशांत कायमस्वरुपी तणाव आहे.
Pak-Afghan War : पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये आणखी एक शांतता चर्चा निष्फळ; आता पुढे काय होणार?
Ans: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये चमन सीमेवर कंधारच्या स्पिन बोल्दाक जिल्ह्यात गोळीबार झाला आहे.
Ans: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या संघर्षात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Ans: अफगाणिस्तानने पाकिस्तानवर कंधारच्या स्पिन बोल्दड जिल्ह्यात पहिल्यांदा हल्ला केल्याने, त्यांच्या सैन्याने गोळीबार केला असल्याचे म्हटले आहे.
Ans: पाकिस्तानच्या मते, अफगाण सैनिकांनी कोणत्या कारणाशिवाय त्यांच्या सैन्यावर गोळीबार केला असल्याचा आरोप केला आहे.






