सिंधु जल करारावरून पाकिस्तान बरळला (फोटो- सोशल मिडिया)
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झालयानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. भारताने सिंधु जल करार स्थगित केला आहे. सिंधु जल करार स्थगित केल्याने पाकिस्तानच्या काही भागात पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आता याच प्रकरणावरून पाकिस्तानचे फील्ड मार्शल पुन्हा भारताविरुद्ध बरळले आहेत.
भारताने सिंधु जल करार स्थगित केल्यापासून पाकिस्तान भारतावर टीका करत आहे. पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर बोलताना म्हणाले, “सिंधु जल करार पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाचा आहे. आम्ही करार कधीही तुटू किंवा स्थगित होऊ देणार नाही. पाकिस्तानमधील 24 कोटी नागरिकांसाठी सिंधु नदीचे पाणी महत्वाचे आहे.”
22 एप्रिल रोजी भारताच्या पहालगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर भारताने सिंधु जल करार स्थगित करून पाकिस्तानला दणका दिला आहे. यामुळे पाकिस्तानध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. हा करार म्हणजे लक्ष्मण रेष असून, पाकिस्तानच्या सैन्य प्रमुखांनी भारताला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.