पाकिस्तानी यूट्यूबर शोएब चौधरीने भारतातील मुस्लिमांची स्थिती आणि मुख्यमंत्री योगी यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानी लोकांचे मत घेतले. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समुदायाला पूर्ण सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पाकिस्तानी यूट्यूबर शोएब चौधरीने भारतात मुस्लिमांची स्थिती आणि ईदच्या साजरीकरणावर चर्चा केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये पाकिस्तानातील अनेक लोकांनी भारतातील मुस्लिमांविषयी आपली मते मांडली आहेत. काही जणांनी दावा केला की उत्तर प्रदेशातील मुस्लिम सुरक्षित नाहीत, तर काहींनी सांगितले की भारतामध्ये मुस्लिम समुदाय अधिक सुरक्षित आणि स्वातंत्र्याने सण साजरे करू शकतो. या चर्चेमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये या विषयावर चर्चा रंगली आहे.
पाकिस्तानी यूट्यूबर शोएब चौधरी यांनी ईदच्या निमित्ताने भारत आणि उत्तर प्रदेशातील मुस्लिमांचा अनुभव जाणून घेण्यासाठी रस्त्यावर लोकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या सर्वेक्षणात एका व्यक्तीने म्हटले की, “यूपीमध्ये मुस्लिमांना सुरक्षित वाटत नाही. त्यांना त्यांच्या सणांच्या वेळी बंधनांचा सामना करावा लागतो.” याउलट, दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, “माझा एक मित्र भारतात राहतो, तो मुस्लिम आहे. त्याने मला सांगितले की, भारतात मुस्लिम सण पाकिस्तानपेक्षा जास्त उत्साहाने साजरे होतात.” युट्युब व्हिडिओमध्ये सहभागी झालेल्या आणखी एका महिलेला विचारले असता, तिने मत व्यक्त केले की, “पाकिस्तानमध्ये ईद मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. भारतात लोक ईदवर एवढा खर्च करत नाहीत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारत नव्हे ‘हा’ आहे जगातील असा एकमेव देश आहे जिथे प्रत्येक काम हिंदू कॅलेंडरनुसार केले जाते
यूपीच्या संभल जिल्ह्यात रमजानच्या शेवटच्या शुक्रवारी नमाज अदा करण्यासंदर्भात प्रशासनाने काही आदेश जारी केले होते. या आदेशानुसार
कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर नमाज अदा करू नये.
घराच्या गच्चीवरही नमाज पठण करण्यास परवानगी नाही.
या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. काहींनी असा आरोप केला की मुस्लिमांना त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर बंधनं येत आहेत, तर काहींनी प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थन केले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की “यूपीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक मुस्लिम नागरिकाला संपूर्ण सुरक्षा दिली जाईल.” पाकिस्तानातून काहींनी या विधानावर प्रश्न उपस्थित केले. काहींनी म्हटले की “जर यूपीमध्ये मुस्लिम सुरक्षित असते, तर त्यांना सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास मज्जाव का केला जात आहे?”. तर काहींनी योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनाचे समर्थन केले आणि “भारतामध्ये मुस्लिमांना इतर धर्मांच्या लोकांप्रमाणेच समान अधिकार मिळतात,” असे मत व्यक्त केले.
credit : YouTube
या चर्चेवर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पाकिस्तानात भारतातील मुस्लिमांविषयी अनेक चुकीच्या समजुती आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा चर्चा अधिक प्रखर होत असतात. विशेष म्हणजे, पाकिस्तानातील अनेक लोकांना असे वाटते की भारतामध्ये मुस्लिमांना धार्मिक स्वातंत्र्य नाही, पण याला काही उदाहरणे आहेत, जिथे भारतीय मुस्लिम अधिक समृद्ध जीवन जगतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : EID 2025: सौदी अरेबियाने चंद्रदर्शनाबाबत जगाला टाकले गोंधळात? ब्रिटिश तज्ञांचे सवाल
सीएम योगींच्या वक्तव्यावर पाकिस्तानमध्ये अनेक प्रतिक्रिया उमटल्या असल्या, तरी भारतात मुस्लिम समुदायाच्या सुरक्षेबाबत प्रशासन जबाबदारीने काम करत आहे. संभलच्या प्रकरणावरून प्रशासनावर टीका झाली असली, तरी भारतातील अनेक मुस्लिम नागरिक पाकिस्तानच्या तुलनेत अधिक स्वातंत्र्याने आणि शांततेत आपले सण साजरे करत असल्याचे सांगतात. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडिओमुळे भारत आणि पाकिस्तानमधील मुस्लिम समाजाच्या वास्तव परिस्थितीबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.