'कराचीमध्ये सोडून दिलं अन् दिल्लीत दुसरी...' ; पाकिस्तानी महिलेची PM मोदींकडे न्यायाची विनंती, नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pak-Afghan War : पाकिस्तान-अफगाण संघर्षाचा पुन्हा भडका; सीमेवर भीषण गोळीबार
निकीताने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, तिचा नवरा विक्रमने तिच्याशी लग्न करुन तिला कराचीमध्ये सोडले आहे. 26 जानेवारी 2020 मध्ये त्यांचे हिंदू पद्धतीने लग्न झाले होते. परंतु आता तिचा नवरा विक्रम दिल्लीमध्ये दुसरे लग्न करण्याच्या तयारीत आहे. निकीताने सांगितले की, सुरुवातील दोघांमध्ये चांगला संसार सुरु होता. पण काही काळाने विक्रम तिला पाकिस्तानमध्ये घेऊन आला. काही दिवस सर्व काही सुरळित सुरु होते. पण काही दिवसांनी निकीताला तिच्या नवऱ्याचे तिच्या नातेवाईकाच्या संबंधातील एका महिलेशी संबंध असल्याचे कळाले. मात्र तिने यावर कोणताही वाद घरात काढला नाही.
निकीताने सांगितले की, तिच्या नवऱ्याने 9 जुलै 2020 मध्ये तिला व्हिसासाठी अटारी सीमेवर आणून सोडले. ती एकटीच पाकिस्तानमध्ये परतली. तिला भारतात येण्यासाठी तिच्या कुटुंबाने देखील मदत केली नाही. सध्या ती पाकिस्तानमध्ये अडकली आहे. कराचीमध्ये असताना तिला तिच्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल माहिती मिळाली तेव्हा तिला मोठा धक्का बसला होता. तिने 27 जानेवारी 2025 मध्ये अधिकृत तक्रार दाखली केली आहे. हे प्रकरण मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. परंतु अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. दोन्ही पती-पत्नी भारतीय नागरिक नसल्याने हे प्रकरण पाकिस्तानच्या अधिकार क्षेत्रात येते असे न्यायालयाचे म्हणणे आहे.
सध्या या प्रकरणाची इंदूरच्या प्रशासकीय यंत्रणेने स्वतंत्र चौकशी सुरु केली आहे. आता दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांकडून यावर निर्णायक कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान निकीताने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींकडे न्यायाची विनंती करत व्हिडिओ शेअर केला आहे.
Pakistan की महिला ने PM मोदी से मांगी मदद, कहा- पति को डिपोर्ट करें, उसने इंडिया में सगाई कर ली#PakistanNews #PMModi #DeportationCase #InternationalNews #ViralStory #IndiaPakistan #SocialMediaBuzz #BreakingNews #RelationshipDrama pic.twitter.com/k4u5ctvulN — BSTV MP-CG (@BSTVdigital) December 6, 2025
Pak-Afghan War : पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये आणखी एक शांतता चर्चा निष्फळ; आता पुढे काय होणार?
Ans: पाकिस्तानच्या कराचीची रहिवासी निकीता नागदेवने पंतप्रधान मोदींकडे तिला वैवाहिक जीवनात सुरक्षितता, न्याय देण्याची मागणी केली आहे.
Ans: पाकिस्तानच्या कराचीची रहिवासी निकीता नागदेवने तिचा नवरा विक्रमने तिला कराचीमध्ये एकटे सोडल्याचा आणि दिल्लीत दुसऱ्या महिलेशी लग्न करत असल्याचा आरोप केला आहे.






