(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे देखील वाचा : Middle East Conflict : मध्यपूर्व पुन्हा पेटलं! इराणचा अमेरिकन नौदल तळावर मोठा हल्ला; MQ-9 ड्रोन पाडल्याचा दावा
पंतप्रधान मोदी १३ जून रोजी फ्रान्स दौऱ्याची सुरुवात करणार आहे. सुरुवातीला नीस शहराला भेट देतील. यानंतर ते फ्रान्सचे राष्ट्राध्य इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्याशी १४ जून रोजी द्विपक्षीय चर्चा करणार आहे. तसेच मॅक्रॉन यांच्यासह भारत इनोवेट्स कार्यक्रमाचे उद्घाटनही पंतप्रधान करतील. या कार्यक्रमाअंतर्गत स्टार्टअप्स आणि व्हेंचर कॅपिटलसवर भर दिला जाणार आहे.
यानंतर पंतप्रधान मोदी १४ ते १६ जून दरम्यान स्लोव्हाकियाच्या राजकीय दौऱ्यावर असणार आहेत. १९९३ मध्ये स्लोव्हाकियाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली होती. त्यानंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा आहे. पंतप्रधान मोदी तिथे स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको आणि राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांची भेट घेतली. या बैठकीत व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल्स आणि रेल्वे उत्पादन यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा होणार आहे.
या दौऱ्याचा मुख्य उद्देश म्हणजे १६-१७ जून रोजी फ्रान्सच्या एव्हियन येथे होणाऱ्या G-7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहे. या परिषदेत कृत्रीम बुद्धिमत्तेचा सुरक्षित विस्तार, जागतिक एकता आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी नवी भागीदारीवर चर्चा होणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान मोदींचा G-7 परिषदेत सहभाग हा ग्लोबल साऊथच्या विकसनशील देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. इंडिया इनोव्हेट्स आणि विव्हाटेक सारख्या कार्यक्रमात भारतीच उपस्थिती राष्ट्राला डिजिटल परिवर्तनाचे केंद्र म्हणून सादर करत आहे. यामुळे संपूर्ण युरोपियन युनियनसोबतच्या भारताच्या सर्वसमावेश भागीदारीला मजबूती मिळेल.
हे देखील वाचा : US citizenship revocation : भारतीय प्रवाशाला अमेरिकेत मोठा झटका; नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरु, कारण काय?






