Portugal Wildfire : पोर्तुगाल आगीच्या विळख्यात! ३०,००० हेक्टर जंगल क्षेत्र खाक; सरकारकडून देशात आणीबाणी जाहीर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अधिकृत आकडेवारीनुसार, यंदा पोर्तुगालमध्ये जंगलात आग लागल्याच्या ४,५९२ घटना घडल्या असून यामध्ये तब्बल ३०,१५५ हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जळालेल्या क्षेत्रात चौपट वाढ झाली आहे. तसेच आगीच्या घटनांमध्येही ७० टक्के वाढ झाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या आठवड्यात केवळ चार दिवसांत निम्म्याहून अधिक क्षेत्र जळून खाक झाले आहे. वणव्याची तीव्रती नक्की किती याचा अंदाज लावणे कठीण जात आहे. २०१७ नंतर पहिल्यांदाच मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या आठवड्यापासून पोर्तुगालमध्ये तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाढत्या धोक्यामुळे सरकारने संपूर्ण देशात आणीबाणी जाहीर केली आहे. तसेच नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
पोर्तुगालमधील १८ पैकी १२ जिल्ह्यांमध्ये सध्या रेड अलर्ट लागू आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये आग लागण्याचा धोका वाढला आहे. सरकारने नागरिकांना जंगली परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो यांनी संकाटाचा सामना करण्यासाठी युरोपियन नागरी सुरक्षा यंत्रणा सक्रिय करण्याची घोषणा केली आहे. स्पेन आणि मोरोक्कोच्या सहकार्य कारारांतर्गत अतिरिक्त अग्निशमन दल आणि यंत्रणा मागवण्यातआ ली आहे. यामुळे आग विझवण्यास काम झपाट्याने करता येईल.
WORLD WEATHER NEWS DEVASTATING WILDFIRES CONTINUE TO RAVAGE SOUTHERN EUROPE Good morning everyone, The wildfire situation across southern Europe continues to deteriorate, with firefighters battling around the clock as huge blazes tear through forests, grassland and… pic.twitter.com/vtq0Bm2IAE — Kernow Weather Team (@KWTWeather) July 7, 2026






