कणे कोप्रोली खारभूमी योजनेचा बंधारा २०१९ आलेल्या महापूरात फुटून मोठ आर्थीक नुकसान गावक-यांना सोसावे लागले होते. या परिस्थीतीची गांर्भियाने दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केंद्र सरकारच्या कोकण आपत्ती सौमिकरण योजनेतून बंधारा मजबूतीकरणा साठी प्रस्ताव दाखल करण्याचे खारभूमी सर्वेक्षण अन्वेशन विभागाला सांगीतले होते. त्यानुसार केंद्र व राज्यसरकारने यासाठी विशेष तरतूद करुन पाच किलोमीटर लांबीचा या बंधा-यासाठी ८.८०० कोटी निधीची तरतूद उपलब्ध करुन यांचे टेंडर प्रोसेस कार्यारंभ आदेश होऊन २०२४ पासून मे २०२६अशा दोन वर्षात हे काम पूर्ण केले असून या कामाबाबत अधिकारी व ठेकेदार यांनी केलेला दुर्लक्षित पणावर अनेकदा गावक-यांनी या निकृष्ट कामाबाबत तक्रार निवेदन दिली आहेत.
Karjat News : कर्जतच्या पळसदरीत दरड कोसळली; पाच वाहने मातीखाली, मुख्य रस्ता बंद
खारभूमी अधिका-यांसोबत बैठकांमधे ठेकेदाराने केलेले निकृष्ट कामाबाबत दोषारोप करुन देखिल कार्यकारी अभियंता विजय पाटील, उप अभियंता भोईर, शाखा अभियंता अश्वीनी पाटील यांनी केलेला दुर्लक्षीतपणाची किमंत गावातील शेतकरी बांधवाना भोगावी लागली. गावातील ९५० एकरावरील रोपवाटीका पाण्याखाली जाऊन कूजल्या. आता शेतीची लागवड कशी करणार, महागडे बी बियाणे, खतांचा मारा यांची नुकसानीस कारणीभूत ठरला आहे तो खारभूमी विभाग. आलेल्या विकासनिधीचा योग्य वापर न करता इस्टिमेटनुसार मटेरिएल न केलेला वापर बंधा-याचे मजबूती करण्यासाठी शेततलावातील मातीचा सर्रास वापर यामुळे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बंधारा मजबूती करताना रूंदीकरणात उंची दगडी मुरुमाचा कमी वापर यामुळे पाऊस आला धाऊन बंधारा गेला वाहून अशी अवस्था झाली असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी मुसळधार पाऊस असताना देखील तब्बल तासभर थांबून गुडघाभर पाण्यातून पोलीस अधिक्षक ऑंचल दलाल, जिल्हा परिषद सिईओ नेहा भोसले, प्रांत प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी जालंदर नालकुल, सहाय्यक पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी यांच्यासह संयुक्त पहाणी करुन आपत्तीग्रस्थ ग्रामस्थांना सर्वोतोपरी तातडीने मदत करण्याचे ठोस आश्वासन दिले. ग्रामस्थांनी पोलीस व आपत्ती यंत्रणेने केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी यांना माहिती देत सर्व यंत्रणाचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.
Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष






